crime
Sakal
Hyderabad ATM Shooting Incident : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये शनिवारी सकाळी केरळमधील एका तरुण व्यावसायिकावर झालेल्या दरोडा आणि गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. कोझीकोड येथील २६ वर्षीय रिनशाद पी.व्ही. कोटी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) एटीएममध्ये ६ लाख रुपये जमा करण्यासाठी जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
कपड्यांचा व्यापारी असलेला रिनशाद या महिन्यात कपडे खरेदी करण्यासाठी हैदराबादला आला होता. मात्र खरेदी पूर्ण करू न शकल्याने तो त्याच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी गेला होता. दरम्यान, ३१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास, रिनशाद बँक स्ट्रीट रोडवरील एसबीआय मेन ब्रांच एटीएमजवळ पोहोचला. तो त्याची रोख रक्कम असलेली बॅग घेऊन एटीएमजवळ उभा असताना, मागून दोन अज्ञात हल्लेखोर त्याच्याकडे आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी एकाने अचानक रिनशादवर पिस्तूल रोखली आणि गोळीबार केला, ज्यामुळे त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. तो घटनास्थळीच कोसळला. यानंतर हल्लेखोरांनी ६ लाख रुपये असलेली बॅग आणि दुचाकीच्या चाव्या घेत, या हल्ल्यातील पीडिताच्या दुचाकीवरूनच पळ काढला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी चादरघाट, नंतर निंबोलियाड्डा आणि काचीगुडा येथे पळून गेले, जिथे त्यांनी दुचाकी सोडून दिली, कपडे बदलले आणि नंतर काचीगुडा एक्स-रोड्सकडे चालत गेले.
दुसरीकडे जखमी रिंशादला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर तातडीचे उपचार करण्याते आले असून, आता त्याची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी सुलतान बाजार पोलिस ठाण्यात दरोडा आणि हत्येच्या प्रयत्नाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विशेष गुन्हे पथके सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि इतर पोलिस ठाण्यांशी समन्वय साधत आहेत.
शिवाय, माहिती असलेल्या एखाद्याने पैशांबद्दल माहिती लीक केली आहे का? हे देखील पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अद्याप कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. हैदराबादचे पोलिस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी हल्लेखोरांशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी १०० नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.