Rohit Shetty murder plot : लॉरेन्स टोळीने रचला होता रोहित शेट्टीच्या हत्येचा कट? ; ‘FIR’मधून खळबळजनक माहिती उघड!

Lawrence Gang allegedly plotted Rohit Shetty murder : पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
Bollywood filmmaker Rohit Shetty amid heightened security concerns after FIR revelations linked to the Lawrence gang murder plot.

Bollywood filmmaker Rohit Shetty amid heightened security concerns after FIR revelations linked to the Lawrence gang murder plot.

esakal

Updated on

Rohit Shetty news : मुंबईतील जुहू परिसरात वास्तव्यास असणाऱ्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेला मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी आता पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

शिवाय, कालच मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणी पुण्यातून चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर मुख्य शूटरला मदत केल्याचा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पुरवल्याचा आरोप आहे. एफआयआरनुसार, तक्रारदार स्वप्नील साळुंखे (३१) हा रोहित शेट्टीचा अंगरक्षक आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना वॉन्टेड घोषित केले आहे. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कथित सदस्य शुभम लोणकर आणि दुसरा अज्ञात शूटर आहे.

स्वप्नील साळुंखे यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे की, "१ फेब्रुवारी २०२६ रोजी, रात्री १२:४५ वाजता, मी शेट्टी टॉवर्स इमारतीच्या लॉबीमध्ये सीसीटीव्ही स्क्रीनजवळ बसलो होतो. माझ्यासोबत आणखी एक अंगरक्षक, वाहिद मलिक देखील उपस्थित होता. पोलिस अंगरक्षक आशिष राणे सहाव्या मजल्यावर जेवण करत होते, तर रोहित शेट्टी सातव्या मजल्यावर विश्रांती घेत होते."

Bollywood filmmaker Rohit Shetty amid heightened security concerns after FIR revelations linked to the Lawrence gang murder plot.
High Risk Alert : सावधान! ‘Firefox’ अन् ‘Thunderbird’ युजर्सना सायबर हल्ल्यांचा धोका

याचदरम्यान, "अचानक, मला फटाक्यासारखा आवाज ऐकू आला. मी सीसीटीव्ही स्क्रीन तपासली तेव्हा, रोड क्रमांक १० वर शेट्टी टॉवर्सच्या कंपाऊंड भिंतीजवळ काळे जॅकेट आणि पांढरी पॅन्ट घातलेला एक अज्ञात माणूस दिसला. त्याच्या हातात पिस्तूलसारखी वस्तू होती आणि त्याने इमारतीच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या."

Bollywood filmmaker Rohit Shetty amid heightened security concerns after FIR revelations linked to the Lawrence gang murder plot.
Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

गोळीबारानंतर काय झाले? -

एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे की, गोळीबारानंतर लगेचच अंगरक्षक वाहिद मलिक आणि गेटवर तैनात असलेले सुरक्षा रक्षक सत्यम पाठक बाहेर पळाले. तेव्हा आरोपी पुष्पा पार्कच्या दिशेने धावत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिस बॉडीगार्ड आशिष राणे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना फोन केला आणि जुहू पोलिस स्टेशनचे एक पथकही घटनास्थळी पोहोचले.

Bollywood filmmaker Rohit Shetty amid heightened security concerns after FIR revelations linked to the Lawrence gang murder plot.
Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

तर स्वप्निल साळुंखे यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना खात्री आहे की आरोपींनी रोहित शेट्टीला मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. एफआयआरमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, आरोपींनी जुहू येथील विलेपार्ले येथील शेट्टी टॉवर्सच्या बाहेरून चित्रपट निर्माते रोहित शेट्टीवर गोळीबार केला. तक्रारदाराने एका अज्ञात आरोपीविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com