'धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही'; बबिता फोगटचे जोरदार प्रत्युत्तर

Babita-Phogat
Babita-Phogat

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात अनेक वाद-विवाद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत तबलिगी जमातच्या एका कार्यक्रमानंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याचे बोलले जात होते. याच तबलिगी जमातला लक्ष्य बनवत भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगटने एक ट्विट केले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे.

या ट्विटच्या बचावात बबिताने आणखी एक व्हिडिओ ट्विट केले असून त्यामध्ये तिने धमकी देणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 'अशा धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही,' असे प्रत्त्युत्तर बबिताने दिले आहे. 

बबिताने गुरुवारी तबलिगी जमातबाबत एक ट्विट केले होते. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या त्या ट्विटबद्दल नाराजी व्यक्त केली. तर काहींनी तिला धमकीसुद्धा दिली आहे. 

कुस्तीपटू बबिताने शुक्रवारी (ता.१७) एक व्हिडिओ ट्विट केला असून यामध्ये तिने म्हटले आहे की, 'गेल्या काही दिवसांपासून मी काही ट्विट केले आहेत. त्यामुळे मला वारंवार धमक्या येऊ लागल्या. सोशल मीडियातही अनेकजण मला शिव्या देत आहेत. तसेच धमक्यादेखील देत आहेत. धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही. मी देशासाठी मैदानात लढली आहे. त्या ट्विटवर मी आजही कायम आहे. त्यात गैर काही लिहलं नाही.'

व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये बबिता म्हणते की,  'जर तुम्ही खरंच बबिता फोगटला पाठिंबा देत असाल. तर ही गोष्ट त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा.' कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ लागल्यानंतर मी ट्विट केले होते. तबलिगी जमातच्या काही माणसांमुळेच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. जर तबलिगी समाजाचे लोक एकत्र जमा झाले नसते, तर देशावर असे संकटच आले नसते. मी कायम सत्य बोलत आली आहे. आणि यापुढेही सत्य बोलत राहीन.'

काय म्हणाली होती बबिता?

अर्जुन पुरस्कार विजेती ३० वर्षीय बबिता आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, 'कोरोना व्हायरस भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी समस्या आहे. जहाल वृत्तीच्या जमाती अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत.' बबिताच्या या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. 

अकाउंट झाले होते ब्लॉक
वादग्रस्त ट्विटप्रकरणी बबिताचे ट्विटर अकाऊंट गेल्या महिन्यात ब्लॉक करण्यात आले होते. मात्र, सदर ट्विट डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिस यांच्यावर हल्ले करणाऱ्यांविरोधात लिहले होते, असे स्पष्टीकरण बबिताने दिले होते. त्यानंतर तिचे अकाउंट सुरू करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com