
नवी दिल्ली : आपल्या पाळीव कुत्र्याला सकाळी फेरफटका मारण्यासाठी खेळाच्या स्टेडियममध्ये घेऊन जाणाऱ्या आणि त्यासाठी संपूर्ण स्टेडियमच रिकाम करण्याचे आदेश देणाऱ्या महिला आयएएस अधिकाऱ्याला महागात पडलं आहे. अरुणाचल प्रदेशच्या सरकारनं त्यांना सक्तीनं घरी बसवलं आहे, अर्थात निवृत्त केलं आहे. (IAS officer compulsorily retired who emptied Delhi stadium to walk her dog)
रिंकू दुग्गा असं या महिला आयएएस अधिकाऱ्याचं नाव असून त्या १९९४ च्या AGMUT (अरुणाचल प्रदेश-गोवा-मोझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) या केडरच्या अधिकारी आहेत. सध्या या महिला अधिकाऱ्याची अरुणाचल प्रदेशात स्वदेशी व्यवहार मंत्रालयात मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होती. (Latest Marathi News)
दरम्यान, केंद्रीय नागरी सेवा (CCS) पेन्शन नियम, 1972 च्या मूलभूत नियम (FR) 56(j), नियम 48 अंतर्गत दुग्गा यांना त्यांच्या सेवा रेकॉर्डचं मूल्यांकन केल्यानंतर सक्तीनं सेवानिवृत्त करण्यात आलं आहे. सरकारला कोणत्याही सरकारी कर्मचार्याला सक्तीनं निवृत्त करण्याचा अधिकार आहे. जर निवृत्तीचं कारण हे सार्वजनिक हिताचं असेल तर, असं सुत्रांनी माहिती देताना म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
रिंकू दुग्गा आणि त्यांचे पती संजीव खिरवार हे देघेही १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. दोघेही वर्षभरापूर्वी दिल्लीत नियुक्तीवर होते. पण त्यांनी एकदा आपल्या पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी खेळाचं स्टेडियम रिकामं केल्याचा प्रकार घडला होता.
याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून आल्यानंतर गेल्या वर्षी या दोन्ही दाम्पत्याची दिल्लीबाहेर बदली करण्यात आली होती. यामध्ये दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशमध्ये तर खिरवार यांची लडाखमध्ये बदली करण्यात आली होती.