
- बेलाजी पात्रे
हिंजवडी : पुणे आयटीनगरी हिंजवडीत सर्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटामुळं विघ्न ओढावलं आहे. ठरवून दिलेल्या आवाजाच्या डेसिबलपेक्षा अधिक आवाजानं एका तरुणाचा बळी घेतल्याची घटना बुधवारी (ता. २७) नऊच्या सुमारास घडली आहे. (Ganesh Festival a young man died due to intense sound of DJ System in Hinjewadi Pune District)
पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश मनोज साखरे (वय २३, रा. हिंजवडी) असं त्या तरुणाचं नाव असून तो क्रांती मित्र मंडळाचा सदस्य आहे. सात वाजता या मंडळानं विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली होती. त्यानंतर बराच काळ डीजेचा दणदणाट सुरु होता. (Latest Marathi News)
या जीवघेण्या डीजेच्या आवाजामुळं तरुणाच्या हृदयाचे ठोके बंद पडून त्याचा मृत्य झाला. या घटनेनंतर सर्व मंडळांनी आपले स्पीकर्स बंद केले आहेत. घटनास्थळी दाखल झालेले हिंजवडी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, कालच (मंगळवारी) सांगली जिल्ह्यातील दोन तरुणांचा डीजेच्या दणदणाटामुळं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळं राज्यात डीजेच्या आवाजामुळं मृत्यू झाल्याच्या तीन घटना झाल्या आहेत.