कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी बीसीजी लस परिणामकारक; ICMR चा दावा

BCG vaccine
BCG vaccine

नवी दिल्ली : जगात गतीने वाढणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर चिंतेचं वातावरण आहे. जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून आता युरोपातील अनेक देशांत या रोगाची दुसरी लाट येण्याचा धोका उद्भवला आहे. या व्हायरसवर प्रभावी ठरेल अशी लस अद्याप उपलब्ध झाली नाहीये. पण जगभरात याबाबत शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घडामोडींच्या दरम्यानच आता Indian Council of Medical Research म्हणजेच आयसीएमआरने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. 

आयसीएमआरच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार ट्युबरक्लॉसिसपासून वाचण्यासाठी वापरली जाणारी बीसीजी लस आता कोरोना व्हायरसच्या विरोधातदेखील प्रभावी ठरू शकते. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, वयस्कर लोकांमध्ये या लशीचा परिणाम जास्तकरुन आढळून येत आहे. सध्या या बीसीजी लशीच्या परिणामांना अभ्यासण्यासाठी संशोधक आता टी सेल्स, बी सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि डेंड्रीटिक सेलच्या अभ्यासात मग्न आहेत. 

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा धोका हा जास्तकरुन साठ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या वयस्कर लोकांमध्येच पहायला मिळाला आहे. कोरोनाच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, ज्या वयस्कर व्यक्तींना कोमॉर्बिडीटीजसारखे गंभीर आजार आहेत त्यांना हा कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. याप्रकाच्या रुग्णांवर उपचारासाठी बीसीजीची लस मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरू शकत असल्याचे दिसून आलं आहे. बीसीजी ही लस नवजात बालकांना केंद्र सरकारच्या सार्वभौमिक प्रतिरक्षण कार्यक्रमाअंतर्गत दिली जाते. 

आयसीएमआरने अशी माहिती दिली होती की, संशोधनादरम्यान असं समजलं आहे की, बीसीजी लशीमुळे वयस्कर लोकांच्या मेमरी सेल्समध्ये बदल होतात आणि शरीरात एँटीबॉडीजदेखील बनतात. आतापर्यंत या लशीचा वापर 54 वयस्कर लोकांवर केला गेला आहे. 86 लोकांपैकी 54 लोकांनाच ही लस दिली गेली होती. तर उर्वरित 32 लोकांना ही लस दिली गेली नव्हती. 

या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, ज्या लोकांना बीसीजी लस दिली गेली होती त्यांच्यात एँटीबॉडीज अत्यंत गतीने बनल्या आहेत आणि असे वयस्कर लोक आता ठणठणीत आहेत. मात्र, अद्यापही या लशीची चाचणी सुरुच आहे. याआधी केलेल्या संशोधनात सांगितलं गेलं आहे की, इंडोनेशिया, जपान आणि युरोपात बीसीजी लशीने श्वसनासंबंधी आजारापासून वयस्कर लोकांची सुरक्षा केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com