esakal | योगासनांचे महत्त्व वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

लडाख - जागतिक योग दिनानिमित्त सियाचीन ग्लॅशियरमध्ये पसरलेल्या बर्फाच्या चादरीवर योगासने करताना भारतीय लष्कराचे जवान.

प्राचीन योगविद्या ही भारताने जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. सध्याच्या काळात तणाव आणि संघर्ष परिस्थितीत योग हा तन-मनाला शांत ठेवण्यास मोठी मदत करतो. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

योगासनांचे महत्त्व वाढले

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाच्या जागतिक साथीमुळे आज जग योगाकडे जास्त गांभीर्याने पाहत आहे. योगसाधनेत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पद्धती आहेत. प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर कोरोनावर निश्चितच मात करता येते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा आदींसह मान्यवरांनी या निमित्त शुभेच्छा दिल्या. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या निवासस्थानी विविध समाजातील मान्यवरांसह योगासने केली. योगदिन हा मानवतेच्या एकरुपतेचा व विश्वबंधुत्वाचा दिवस आहे, असे सांगून मोदींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले की, योग माणसाला शारीरिक - मानसिकदृष्ट्या सक्षम तर करतोच; पण तो देशांच्या सीमेपलीकडचा आहे. माणुसकीचे बंध मजबूत करणाऱ्या योगसाधनेत वंश, वर्ण, लिंग असे भेदभाव नाहीत.

डॉ. मनमोहन सिंगाचा सल्ला पंतप्रधानांनी विनम्रतेना मानावा : राहुल गांधी

सध्याच्या कोरोनाकाळात देशभरात सर्वचजण घरातच योगसाधना करत आहेत, हे अभिनंदनीय असल्याचं मोदी म्हणाले. ‘माय लाईफ माय योगा’ या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेला मिळालेला अपूर्व प्रतिसाद म्हणजे जगभरात योगाबद्दलचे कुतूहल आणि उत्साह वाढत असल्याचेच निदर्शक आहे, “योग: कर्मसु कौशलम्”, अर्थात योगामुळे कृतीप्रवणता वाढून विकास साधला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. योगा हा जगाच्या आरोग्याचा मुकूटमणी बनला आहे. योगासने सर्व वयोगटातील लोकांसाठी लाभदायक आहेत, असे नक्वी यांनी सांगितले.

loading image