भारत-चीन शेजारी देश नाहीत

Trump-Testing
Trump-Testing

ट्रम्प यांच्या भौगोलिक माहितीमुळे मोदींना बसला होता धक्का
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अगाध भौगोलिक ज्ञानाचे प्रत्यंतर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का दिला होता. पुलित्झर पारितोषिक मिळालेल्या दोन पत्रकारांनी लिहिलेल्या एका नव्या पुस्तकात हा दावा केला. 

फिलीप रकर आणि कॅरोल डी. लिओनिंग या दोघांनी ‘ए व्हेरी स्टेबल जिनियस’ हे पुस्तक लिहिले आहे. ट्रम्प आणि रशिया यांच्यातील संबंधांबाबत केलेल्या वार्तांकनाबाबत त्यांना पुलित्झर पारितोषिक प्राप्त झाले होते. या नव्या पुस्तकात या दोघांनी ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या तीन वर्षांचा आढावा घेतला आहे. ट्रम्प यांनी २० जानेवारी २०१७ पासून सूत्रे हाती घेतली होती. ‘पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेवेळी ट्रम्प यांनी, चीन आणि तुमच्या देशाची सीमा सामाईक नाही, असे मोदींना म्हटले होते.

त्यांच्या या विधानानंतर मोदींचे डोळे आश्‍चर्याने विस्फारले होते. यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीही पसरली,’ असा या पुस्तकात दावा करण्यात आला आहे. मोदींनी ही बैठक गुंडाळली आणि ‘हा माणूस पुरेसा गंभीर नाही, मी सहकारी म्हणून त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही’, असे म्हटल्याचा दावाही या पत्रकारांनी ट्रम्प यांच्या एका सहकाऱ्याच्या हवाल्याने केला आहे. तसेच, या बैठकीनंतर भारताने अमेरिकेबरोबरील राजनैतिक संबंधांत एक पाऊल मागे घेतले, असेही या संबंधित सहकाऱ्याने म्हटल्याचे पुस्तकात लिहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com