भारत-भूतानमध्ये संयुक्त प्रकल्प उभारणीच्या करारावर शिक्कामोर्तब; कोणत्या ते वाचा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जून 2020

भूतानमध्ये भारताच्या मदतीने ६०० मेगावॉट जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. दोन्ही देशांनी संयुक्त प्रकल्प उभारणीच्या करारावर आज शिक्कामोर्तब केले. खोलांगछू जेव्ही हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट असे या प्रकल्पाचे नाव असेल.

नवी दिल्ली - भूतानमध्ये भारताच्या मदतीने ६०० मेगावॉट जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. दोन्ही देशांनी संयुक्त प्रकल्प उभारणीच्या करारावर आज शिक्कामोर्तब केले. खोलांगछू जेव्ही हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट असे या प्रकल्पाचे नाव असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरहद्दीवर चिनी आक्रमकतेला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची तयारी करताना भारताने मित्रदेशांच्या मदतीमध्ये उणीव न ठेवण्यावरही लक्ष केंद्रित केले असून, भूतानमधील हा प्रकल्प याच धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे. 

भारतात टिकटॉकवर बंदी; टिकटॉकनं मांडली आपली बाजू

या जलविद्युत प्रकल्पासाठी उभारण्यात आलेली खोलांगछू हायड्रो एनर्जी लिमिटेड ही कंपनी दोन्ही देशांचा संयुक्त उपक्रम आहे. यासाठी भूतानची ड्रन्क ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन आणि भारताची सतलज जलविद्युत निगम लिमिटेड या कंपनीदरम्यान आज करार झाला. हा प्रकल्प पूर्व भूतानच्या त्राशियांगत्से जिल्ह्यातील खोलांगछू नदीवर उभारला जाणार असून, ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहेत. 

खूशखबर ! संपूर्ण भारतीय बनावटीची कोरोनावरील पहिली लस तयार

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भूतानचे परराष्ट्रमंत्री टांडी दोरजी उस्थित होते. जयशंकर यांनी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करताना दोन्ही देशांच्या ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मैत्रीसंबंधांना उजाळा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Bhutan seals agreement on joint project