esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

india china border

चीनकडून भारतात घुसखोरीचे प्रयत्न केले जात असल्याचं सैनिकांच्या निदर्शनास आल्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर आले होते.

अरुणाचल सीमेवर चीनचा घुसखोरीचा प्रयत्न; भारताने पाडला हाणून

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यामध्ये अरुणाचल सेक्टरमध्ये गेल्या आठवड्यात संघर्ष झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये काही तासांच्या चर्चेनंतर यात तोडगा काढण्यात आला. सध्याच्या प्रोटोकॉलनुसार सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्यात आला. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चीनकडून भारतात घुसखोरीचे प्रयत्न केले जात असल्याचं सैनिकांच्या निदर्शनास आल्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. अरुणाचलमधील तवांग इथं घुसखोरी करून भारतीय सीमेवर असलेल्या बंकर्सना उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चीनचे २०० सैनिक भारतीय सीमेत घुसल्याण्याच्या प्रयत्नात होते अशीही माहिती मिळत आहे.

हेही वाचा: ‘पाकच दहशतवादाचा पाठिराखा’

गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बुम ला आणि यांगत्से सीमे दरम्यान ही घटना घडली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैनिकांना घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्यांना अडवलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती.

loading image
go to top