चीन विरोधात भारतीय लष्कराच्या 6 तुकड्या तैनात, सीमावर्ती भागात घडामोडींना वेग

india china tension 6 indian army divisions shifted from pak front o tackle china threat rak94
india china tension 6 indian army divisions shifted from pak front o tackle china threat rak94

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अलीकडेच त्यांच्या लडाख सेक्टरच्या भेटीदरम्यान चीनकडून भारताला असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान चीनमुळे तयार झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कराने LAC वर सहा तुकड्या तैनात केल्या आहेत. त्यात सुमारे 50 हजार सैनिक आहेत. या तुकड्या पूर्वी पाकिस्तानी आघाडीवर आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या.

लडाख सेक्टरमध्ये चीनशी झालेल्या संघर्षाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. यादरम्यान लष्कराकडून आपल्या सैन्याची पुनर्रचना आणि पुनर्गठन केले जात आहे, हे सैन्य पूर्वी उत्तरेकडील सीमांवरील आव्हानांपेक्षा पाकिस्तानच्या धोक्याचा सामना करण्यासाठी अधिक तयार होते. वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत या कामानंतर दोन तुकड्या किंवा सुमारे 35,000 सैनिक चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. यापूर्वी ते दहशतवादविरोधी कामासाठी तैनत होते..

सुत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स ची एक डिव्हीजन जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद विरोधी मोहिमेतून काढून आता पूर्व लडाख सेक्टरमध्ये तैनात करण्यात आली आहे. येथे आधीपासूनच तीन डिव्हीजन्स तैनात आहेत. तसेच याचप्रमाणे असामच्या तेजपूर येथील गजराज कॉर्प्सअंतर्गत एका डिव्हीजनला बंडखोर विरोधी मोहीमेतून हटवण्यात आले असून ईशान्येकडील चीन सीमेवर हलविण्यात आले आहे

india china tension 6 indian army divisions shifted from pak front o tackle china threat rak94
"कोणाच्या वडिलांच्या.."; केतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

उत्तर कमांडमध्ये यूपीच्या दोन तुकड्या तैनात

लडाख सेक्टरमध्ये तैनात 17 माउंटन स्ट्राइक कॉर्प्स आता ईशान्य भागात तैनात करण्यात आले आहेत. तसेच झारखंडमधील आणखी एक डिवीजन येथे तैनात करण्यात आली आहे. या डिव्हीजनच्या काही भागांना पूर्वी पश्चिम आघाडीवर स्ट्राइक ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील दोन लष्करी तुकड्या आता लडाख थिएटरसाठी नॉर्दर्न कमांडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडमधील स्ट्राइक कॉर्प्सची एक तुकडी सेंट्रल कमांडमध्ये तैनात करण्यात आली आहे. यावर संपूर्ण सेंट्रल सेक्टरची जबाबदारी असणार आहे. चीनने या क्षेत्रात अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की, लष्कराच्या चार स्ट्राइक कॉर्प्सपैकी दोन आता चीनच्या सीमेवर तैनात आहेत, तर आधी त्यापैकी तीन पाकिस्तानच्या सीमेवर होत्या. मोठ्या संख्येने सैन्य दलाच्या तैनातीमुळे, चीनच्या लष्कराला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. भारतीय सीमेवर मोठ्या प्रमाणात चीनी सैनिक तैनात केल्यानंतर भारताने चीनच्या सीमेवर सुमारे 50,000 सैनिक तैनात केले आहेत.

india china tension 6 indian army divisions shifted from pak front o tackle china threat rak94
फडणवीसांच्या सभेला अवतरले मोदी; अस्सलिखित मराठीत दिली प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com