लडाखसारख्या अतिदुर्गम युद्धभूमीवर भारताला शत्रूशी दोन हात करणे सहज शक्य; कसे ते वाचा सविस्तर

Tank
Tank

नवी दिल्ली - चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर  भारताने देखील आपली संरक्षणसज्जता वाढवायला सुरवात  केली असून आता अति उंचावरील ठिकाणांवर तैनात करणे शक्य असणाऱ्या वजनाला हलक्या रणगाड्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या शस्त्रामुळे लडाखसारख्या अतिदुर्गम युद्धभूमीवर भारताला शत्रूशी दोन हात करणे सहज शक्य होईल. विशेष म्हणजे या रणगाड्यांची मारक क्षमता देखील अवजड रणगाड्यांसारखीच असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या केवळ रशियाच अशाप्रकारच्या वजनाला हलक्या रणगाड्यांची निर्मिती करतो. रशियन बनावटीच्या ‘स्प्रुट- एसडीएम १’ या रणगाड्यांची मारक क्षमता अधिक आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये तैनात केलेल्या रणगाड्यांचे नाव हे ‘टी-१५/झेडटीपीक्यू’ असे आहे. मुळातच हे रणगाडे वजनाला हलके असल्याने त्यांची वाहतूक करणे देखील अधिक सोपे असते. अगदी पॅराशूटच्या माध्यमातून देखील या रणगाड्यांना सहज  टेकडीवर पोचविता येईल. चीनने रणनितीक व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या स्थळांवर पोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची उभारणी केली आहे.

भारताकडून देखील वेगाने अशाप्रकारचे रस्ते  उभारले जात असले तरीसुद्धा ते प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बराच वेळ लागणार आहे, त्यामुळे सध्या तरी हे रणगाडेच भारतासाठी महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे. विशेष म्हणजे चीनकडे सध्या अशाप्रकारचे रणगाडे असून त्यांनी ते पूर्व लडाखमध्ये तैनात देखील केल्याने भारताच्या चिंता वाढल्या आहेत.

काय आहे एअर ड्रॉप सिस्टिम?
प्रत्यक्ष आणीबाणीच्यावेळी किंवा युद्धसरावादरम्यान लष्कराला दारूगोळ्याची टंचाई भासू लागते तेव्हा रसद पुरविण्यासाठी पारंपरिक रस्त्याच्या मार्गाऐवजी या प्रणालीचा वापर करून आकाशातून रसद पुरविण्यात येते. एखाद्या विशिष्टस्थळी  विमान उतरविण्याऐवजी पॅराशूटच्या माध्यमातून तेथे शस्त्रे टाकली जातात.  विशेष म्हणजे या प्रक्रियेसाठी फार वेळही लागत नसल्याने ही प्रणाली लष्करासाठी सोयीचे असते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com