Why is India planning a gas pipeline from Oman?
esakal
India Oman underwater gas pipeline project : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील ऊर्जा संकटांपासून संरक्षण मिळवण्यासाठी भारताने ओमान ते गुजरात दरम्यान समुद्राखाली उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा पुन्हा विचार सुरू केला (Oman to Gujarat natural gas pipeline) आहे. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, सुमारे २,००० किलोमीटर लांबीची ही डीप-सी गॅस पाईपलाईन प्रत्यक्षात आली, तर ती भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठा टप्पा ठरेल.