Tiger
Tiger

भारतात चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट; जागतिक विक्रमाची नोंद केली नावावर

नवी दिल्ली - वाघांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या मोहिमेत भारताने अनोख्या रुपाने जागतिक विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट करण्याबरोबरच ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप देखील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाला आहे. याबाबत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या कामातील हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील वन, जंगल, डोंगराळ भाग असे एकूण १ लाख २१ हजार ३३७ किलोमीटरचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २६ हजार ७६० जागांवर कॅमेरे लावण्यात आले. यात वन्यजीवांचे ३.५ कोटीपेक्षा अधिक फोटो टिपण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा सर्वे मानला जात आहे. त्याची नोंद गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली आहे.

दोन वर्षापूर्वीचे सर्वेक्षण
देशात सुमारे सव्वा लाख किलोमीटरचे सर्वेक्षण दोन वर्षांपूर्वीचे २०१८ चे आहे. त्याचा उलगडा गेल्यावर्षी तर जागतिक विक्रमाची घोषणा आता करण्यात आली. सर्वेक्षणानुसार देशातील वाघांची संख्या २९६७ आहे. त्यांच्या पिलांना गृहित धरले नाही तर त्याची संख्या २४६१ होईल. २००६ मध्ये वाघांची एकूण संख्या १४११ होती. भारताने नऊ वर्षांपूर्वी सेंट पीटसबर्ग येथे २०२२ पर्यंत देशातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र ते अगोदरच पूर्ण केले. सध्या भारतात सर्वाधिक १४९२ वाघ तीन राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये आहेत.

गिनिज वर्ल्ड रिकॉर्डच्या संकेतस्थळावरील माहिती सर्वेक्षण-२०१८-१९
१४१ जागांवरील २६,८३८ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप
१,२१,३३७ चौ. कि.मी. सर्वेक्षणाची व्याप्ती
३,४८,५८,६२३ वन्यजीवांचे छायाचित्र काढले
२४६१ पिलं वगळून वाघांची ओळख
३,८१,२०० चौ. कि.मी. अभ्यासाची व्याप्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ठरवलेल्या कालावधीच्या चार वर्षे अगोदरच वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात आहे. आत्मनिर्भर भारताचे हे एक चांगले उदाहरण मानता येईल. 
- प्रकाश जावडेकर, पर्यावरणमंत्री

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com