भारत हिंदूंचाच देश; भाजप खासदाराचे वक्तव्य

वृत्तसंस्था
बुधवार, 4 डिसेंबर 2019

- देशात हिंदूंची लोकसंख्या जवळपास 100 कोटी

नवी दिल्ली : देशात हिंदूंची लोकसंख्या जवळपास 100 कोटी आहे. त्यामुळे हे सिद्ध होते की भारत हा हिंदूंचा देश आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे बहुसंख्य लोक देशात आहेत. त्यामुळे आपल्याकडे देश आहे त्याचे नाव भारत आहे, असे वक्तव्य उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

'इनर लाइन परमिट' (आयएलपी) लागू असलेल्या अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम या राज्यांना प्रस्तावित नागरिकत्त्व सुधारणा विधेयकातून वगळले जाणार असल्याचा अंदाज आहे. हे विधेयक या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणे अपेक्षित आहे. त्यातच आता खासदार किशन यांनी यावर विधान केले. ते म्हणाले, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे बहुसंख्य लोक देशात आहेत. त्यामुळेच आपल्याकडे देश आहे त्याचे नाव भारत आहे. आपली संस्कृती जगण्यासाठी हा देश आहे, असेही ते म्हणाले. 

सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक!

विधेयकाला काँग्रेसकडून विरोध 

नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाला काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, की मला असे वाटत आहे, की हे विधेयक नैतिकरित्या असंविधानिक आहे. भारतात मूळ विचारांचे उल्लंघन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is a Hindu Rashtra says MP Ravi Kishan