

petrol diesel
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी आणि आयातीवर असलेलं अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यात मिश्रित डिझेल आणि व्यावसायिक एलपीजीची सुरुवात करण्याच्या दिशेनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. भारतीय मानक ब्युरो या इंधनांसाठी गुणवत्ता निकषांना अंतिम रूप देण्यासाठी काम करत आहे.