काँग्रेसला आपलं घर सांभाळता येईना; केंद्रीय मंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

काँग्रेसला आपलं घर सांभाळता येईना; केंद्रीय मंत्र्यांचा राहुल गांधींना टोला
Summary

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस असून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ सुरूच आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस असून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ सुरूच आहे. पेगॅसस पाळत प्रकरण, कोरोना मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेससह 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला घेरण्यासाठी आणि दबाव टाकण्यासाठी तयारी केली आहे. राहुल गांधींसह इतर नेत्यांनी बुधवारी पेगॅसस मुद्द्यावर लोकसभेच्या कामकाजाच्या स्थगितीची नोटीस दिली आहे.

सभागृहात बोलताना राहुल गांधी यांनी म्हटलं की,'पाळत प्रकरणी कोणत्याही प्रकारची तडजोड नाही.' पेगॅसस पाळत प्रकरणावरून विरोधक आक्रमक आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे उत्तर मागत आहेत. तर विरोधक संसदेचं काम होऊ देत नाहीत आणि चर्चेलाही तयार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे.

काँग्रेसला आपलं घर सांभाळता येईना; केंद्रीय मंत्र्यांचा राहुल गांधींना टोला
प्रताप सरनाईकांना २३ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कारवाईपासून दिलासा

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधींनी म्हटलं की, 'पेगॅसस प्रकरणी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. याबाबत 14 पक्षांकडून नोटीस दिली जाईल.' विरोधक याआधी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून बोलत होते. मात्र या बैठकीनंतर पेगॅसस प्रकरणावर विरोधकांचे एकमत असून सरकारला घेरण्याची तयारी केली असल्याचं समजतं.

दरम्यान, राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी टीका केली आहे. काँग्रेसला आपलं घर सांभाळता येत नाही. आजही विरोधी पक्षामधील अनेक लोकांना वाटतं की, संसद चालावी, वादविवाद, चर्चा व्हावी. मात्र काँग्रेस त्यांचे नकारात्मक निर्णय विरोधकांवर लादत आहे. विरोधी पक्षातील इतर पक्षांच्या सकारात्मक विचारांना बांधून घातलं जात आहे असं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं.

दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज सुरु होताच जोरदार गोंधळ झाला. यामुळे राज्यसभा 12 वाजेपर्यंत तर लोकसभेचं कामकाज 12.30 पर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com