India Operation Sindoor : रात्री जेव्हा तुम्ही झोपेत होता, तेव्हा भारतीय लष्करानं पहलगाम हल्ल्याच्या दोषींवर थेट कारवाई करत त्यांच्या अड्ड्यांचा नाश केला. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर रात्रभर चाललेल्या एका गोपनीय मोहिमेअंतर्गत (ऑपरेशन सिंदूर) मोठा हल्ला केला. पाकिस्ताननेही या हल्ल्याची कबुली दिलीये. त्यांनी म्हटलंय, की 'भारतानं कोटली, मुरिदके आणि बहावलपूर येथील नऊ ठिकाणांना लक्ष्य केलंय.' गेल्या काही तासांत घडलेल्या 10 महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या..