चीन, पाकिस्तानला रोखणार 30 ड्रोन; भारत घेणार अमेरिकेची मदत

america drone
america drone

नवी दिल्ली - चीन आणि पाकिस्तानकडून सीमेवर सातत्यानं आगळीक होत असते. याच पार्श्वभूमीवर भारताने सीमेवर लष्कराची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया आणि फ्रान्ससोबत एअरक्राफ्टचा करार केल्यानंतर आता भारत पहिल्यांदा अमेरिकेकडून सशस्त्र ड्रोन खरेदी करण्याची तयारी करत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारत या कराराअंतर्गत 30 एम क्यू 9 बी प्रिडेटर ड्रोनची खरेदी करणार आहे. यामुळे भारताच्या लष्करी ताकदीमध्ये वाढ होईल. ड्रोनच्या माध्यमातून भारताला हेरगिरी आणि नजर ठेवण्यासाठी मदत मिळेल.

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिकेच्या सॅन डिएगो आधारित जनरल एटॉमिक्स यांच्यामध्ये हा करार होणार आहे. जवळपास 3 अब्ज डॉलरचा हा करार असेल. पुढच्या महिन्यात या करारावर सह्या होण्याची शक्यता आहे. अद्याप भारताच्या संरक्षण मंत्रालयाने किंवा जनरल एटॉमिक्स यांनी अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागनने सुद्धा ड्रोन विकण्यासाठी मंजुरीबद्दल माहिती दिलेली नाही.

प्रिडेटर ड्रोन हे जगातील सर्वात धोकादायक ड्रोन समजले जातात. एमक्यू9बी चे वैशिष्ठ्य म्हणजे हे 1700 किलो पेलोडसह सलग 48 तास उड्डाण करू शकतात. भारतीय नौदलाच्या माध्यमातून हिंदी महासागरात घुसखोरी कऱणाऱ्या चीनच्या युद्धनौकांवर जवळून नजर ठेवता येईल. एवढंच नाही तर या ड्रोनच्या माध्यमातून भारत हिमालयातील भागात पाकिस्तानला इशाराही देऊ शकतो.

गेल्या काही वर्षा भारत अमेरिकेच्या मोठा संरक्षण सहकारी म्हणून पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी 250 अब्ज डॉलरच्या योजनेवर काम सुरु केलं आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. तर दुसऱीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका यांच्या क्वाड ब्लॉकची मिटिंग 12 मार्चला होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com