भारताने उपग्रहांची संख्या वाढवावी - नायर

पीटीआय
Saturday, 12 September 2020

बदलत्या काळाला सामोरे जाताना भारताने उपग्रहांच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच सर्व प्रदेशाची माहिती मिळण्याची व्यवस्थाही अधिक व्यापक करणे गरजेचे आहे, असे मत ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ जी. माधवन नायर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

बंगळूर - बदलत्या काळाला सामोरे जाताना भारताने उपग्रहांच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच सर्व प्रदेशाची माहिती मिळण्याची व्यवस्थाही अधिक व्यापक करणे गरजेचे आहे, असे मत ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ जी. माधवन नायर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर माधवन यांनी हे मत व्यक्त केले. मुलाखतीत ते म्हणाले, सुरक्षेसंबंधी सर्व क्षेत्रांमध्ये अंतराळ, पृथ्वी निरीक्षण, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक गुप्तचर यंत्रणा यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असते. माझ्या माहितीनुसार चीनकडे निरीक्षण आणि दळणवळणासाठी अनेक उपग्रह आहेत. त्याद्वारे ते जगाच्या कानाकोपऱ्यात लक्ष ठेवू शकतात. एक वेळ जगाचे सोडून देऊ, पण सीमेपलीकडील हालचाली टिपण्यासाठी तरी भारताकडे सातत्याने लक्ष देण्याची व्यवस्था असायला हवी.’’ 

'लेटरबॉम्ब'नंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; आझाद यांचे पद घेतले काढून

‘विविध क्षेत्रांशी संबंधित उपग्रह अवकाशात सोडून भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. आता सर्व प्रदेशाची माहिती मिळविण्यासाठी जास्तीत जास्त उपग्रह सोडण्याचे व पृथ्वीवर नियंत्रण कक्ष उभारण्याची योजना आखावी. देशाला याची अत्यंत गरज आहे,’’ असेही माधवन म्हणाले.

भविष्यातील युद्धात अंतराळाचा महत्त्वपूर्ण वाटा असणार आहे, असा सांगताना अवकाशातील या संपत्तीचे रक्षण करणे हे पुढे आव्हानात्मक ठरणार आहे.

धक्कादायक! देशात मे महिन्यात होते ६४ लाख रुग्ण; ICMR सिरो सर्वेक्षणाची माहिती

पृथ्वीवरील नियंत्रण केंद्रे, इलेक्ट्रॉनिक गुप्तचर यंत्रणा, दळणवळण आणि जहाजे, विमाने, ड्रोन अशा सर्व स्रोतांमध्ये समन्वय ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जी. माधवन म्हणाले

  • मानवी अवकाश मोहीम वगळता अवकाश तंत्रज्ञानात भारत चीनच्या तोडीस तोड.
  • गगनयान मोहीम सुरू असली या क्षेत्रातील अनेक बाबतीत चीन बलशाली.  
  • चीनची तरतूद पाच पटीने अधिक.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India should increase the number of satellites madhavan nair