
Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने थेट नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने हवाई हल्ल्याचेही प्रयत्न केले. पण भारतीय रडार यंत्रणांनी ते हाणून पाडले. दरम्यान, भारताने थेट पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच स्ट्राइक केला. लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती भारताने दिली.