कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत करेल नेतृत्व; RAISE 2020 परिषदेत अंबानींचं प्रतिपादन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

RAISE2020 ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील पहिली जागतिक परिषद भारत सरकारने आयोजित केली आहे.

नवी दिल्ली : माणसांनी आपलं काम सोपं करण्यासाठी यंत्रांची निर्मिती केली, हे खरंय, पण आता त्यापुढे जाऊन आर्टिफिशिअल इंटेशिजन्स किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता सर्वसामान्य झाली तर? होय, आता भारत त्या दिशेनेच पाऊल टाकतोय. तंत्रज्ञान क्षेत्रात अमुलाग्र क्रांती घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेत जगात नेतृत्व करण्यासाठीची क्षमता भारतात आहे, असं प्रतिपादन रिलायन्स उद्योगसमुहाचे चेअरमन मुकेश अंबानी केलं आहे. RAISE2020 या परिदषेत ते बोलत होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील पहिली जागतिक परिषद भारत सरकारने आयोजित केली आहे. या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. 

RAISE  2020 म्हणजेच Responsible AI for Social Empowerment 2020 या नावाची एक शिखर परिषद 5 ऑक्टोबरपासून पुढिल 5 दिवस चालणार आहे. ही परिषद ऑनलाईन सुरु आहे. AIसाठी भारत ग्लोबल हब बनावा, अशी इच्छा नरेंद्र मोदी यांनी बोलताना व्यक्त केली. AI क्षेत्रात उत्तम अशी कामगिरी भारताने करावी आणि जागतिक पातळीवर आपला देश कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी ओळखला जावा, अशी इच्छाही मोदींनी व्यक्त केली. 

हेही वाचा - रोजगार दूरच, खायला अन्नही मिळणार नाही; कृषी कायद्यावरून राहुल गांधींचा घणाघात
या परिषदेत रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. ही परिषद म्हणजे मोदींच्या दुरदृष्टीचं प्रतिक आहे आणि या परिषदेत सहभागी होणं, हे आपलं भाग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले की, AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डेटा हाच कच्चा माल आहे आणि भारताकडे हा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा सुयोग्यरित्या वापर करुन आपल्याला या क्षेत्रात अत्यंत भरीव अशी कामगिरी करता येईलं. 

हेही वाचा - 'नितीश कुमार यांना आम्ही हरवणार नाही तर...'; चिराग पासवान यांचा हल्लाबोल
सध्या आपल्या देशाकडे उपलब्ध असलेली संसाधने आणि संधी लक्षात घेता या क्षेत्रात आघाडी घेऊन जगात नेतृत्व करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं ते म्हणाले. नव्या मजबूत भारतासाठी AI ला चालना देण्यासाठी देशाची युवा पिढी, इंडस्ट्री आणि संपूर्ण देशच तयार आहे, असंही अंबानी म्हणाले. 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत नीती आयोगाचे प्रमुख अभिताभ कांत, IBM चे सीईओ अरविंद कृष्णा हेदेखील सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Will lead in Artificial Intelligence sector Anil Ambani in RAISE 2020 summit