लष्कराच्या गोळीबारानंतर पळाले पाकचे दहशतवादी (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Friday, 27 September 2019

काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

कुपवाडा : काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून परिसरात मोठा गोळीबार केला जात असून, पाकिस्तानी दहशतवादी पुन्हा पाकिस्तानाच्या दिशेने परतत आहे.

कुपवाडा सेक्टरमध्ये आलेले दहशवादी भारतात घुसून हल्ला करण्याच्या विचारात होते. मात्र, ही बाब भारतीय लष्करातील जवानांच्या लक्षात आल्याने जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानचे हे दहशतवादी 30 जुलैला कुपवाडा सेक्टरमध्ये असल्याचा व्हिडिओ आज (शुक्रवार) जारी करण्यात आला. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

Video : खासदार नवनीत कौर राणा यांनी धरला दांडियावर ताल...

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून अशाप्रकारे घुसखोरी करून हल्ला घडविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. 

Video: विमानात ताजी हवा येण्यासाठी महिलेने उघडलं...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army detected Pakistani terrorists near LoC in Kashmirs Kupwara