सामान्यांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित, आता 4G वर धावणार ट्रेन

येत्या काही दिवसांत हे बदल दिसू लागतील आणि याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे
train
traintrain

नवी दिल्ली: Indian Railways latest News : भारतीय रेल्वेसोबत (Indian Railways) आता अत्यंत आरामात आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे. लवकरच भारतीय रेल्वे आता 4G वर धावून प्रवाशांना सुखाचा प्रवास करता येणार आहे. याचा अर्थ असा की, रेल्वेला जो स्पेक्ट्रम (Spectrum) मिळाला आहे, त्यावर 4G आणि 5G दोन्ही नेटवर्क डेवलप करता येणार आहेत. पण सध्या तरी इंडियन रेल्वे 4G वर काम करणार आहे. येत्या काही दिवसांत हे बदल दिसू लागतील आणि याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे, नुकतेच पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटने 700 MHz ब्रॉडबँड मध्ये रेल्वेला 5 MHz स्पेक्ट्रमचं वाटप केलं आहे. त्यामुळंच रेल्वे तांत्रिकदृष्ट्या मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.

स्पेक्ट्रमचे फायदे (Benefits of Spectrum)

रियल टाइम ट्रॅकिंग

- रेल्वे प्रवाशांना आता रेल्वेची योग्य माहिती आणि रेल्वेचे ठिकाण समजणार आहे. (Accurate train running status)

सुरक्षितता

भारतीय रेल्वेत TCAS (Train collision avoidance system) या सेटअपचा विस्तार होणार आहे. या अत्याधुनिक टेकनिकमुळे ट्रेन ऍक्सिडेंटसारख्या घटनांना आळा बसू शकतो.

सेंट्रलाइज्ड ट्रेन ऑपरेशन्स सिस्टम -

विदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतीय रेल्वे मध्येही आता सेंट्रलाइज्ड ट्रेन सिस्टम बसवले जाणार आहे. यामुळे येत्या काळात ट्रेन ऑपरेशन्स मध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळतील. इतक्या मोठ्या रेल्वेच्या यंत्रणेला एका ठिकाणावरुन ऑपरेट करता येऊ शकणार आहे.

train
लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

- ऍडवांस मॉडर्न सिग्नल सिस्टम मध्ये स्पेक्ट्रमची अत्यंत महत्त्वाची भूमिका

- ट्रेनच्या एव्हरेज स्पीडला वाढवण्यास मिळणार मदत

- पॅसेंजर ट्रेनमधील CCTV कॅमरात रिअल टाइम फुटेज रेकॉर्ड तसंच लाइव्ह स्ट्रीम करता येणार

- सुरक्षेच्या दृष्टीने फायदा

- प्रवाशांना ऑन बोर्ड Wifi सुविधा देता येणार

700 MHz बँड आणि 5 MHz स्पेक्ट्रम म्हणजे काय ?

सध्या भारतीय रेल्वेजवळ (Indian Railways) 2G स्पेक्ट्रम (Spectrum) आहे. याचा वापर सिग्नलिंग आणि कम्युनिकेशनसाठी केला जातो. पण यात अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. आता रेल्वेकडे जे 700 MHz बँड आणि 5 MHz स्पेक्ट्रम आहेत, त्यामुळे ट्रेन्सना 4G नेटवर्कवर चालवता येणं शक्य होणार आहे.

train
Breaking News: जालन्यात पोलिसांकडून आरोपींवर सिनेस्टाईल फायरींग

हेच स्पेक्ट्रम 5G (5G Spectrum) ला सुद्धा सपोर्ट करणार आहे. याच स्पेक्ट्रमच्या मदतीने भारतीय रेल्वेच्या सर्व मार्गांवर ‘LTE’ वर आधारित मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन सर्विस दिली जाईल. सध्याच्या घडीला रेल्वेचं संपूर्ण कम्युनिकेशन नेटवर्क ऑप्टिकल फायबरवर अवलंबून आहे. नव्या स्पेक्ट्रममुळे फास्ट रेडिओ कम्युनिकेशनचा वापर होईल, 2G आणि 4G मध्ये नेमका किती फरक आहे याचा अनुभव सध्या संपूर्ण देश घेतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com