धक्कादायक! अरुणाचल प्रदेशातून भारतीय तरुणाचे चीनने केलं अपहरण

indian youth abducted by china army
indian youth abducted by china army
Summary

चीनी सैन्याने केलेल्या अपहरणाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती देण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नवी दिल्ली - चीनच्या (China) आर्मीने भारतीय (India) हद्दीत घुसखोरी केल्याच्या प्रकार अनेकदा समोर आला आहे. दरम्यान, आता एका खासदाराने भारतीय तरुणाचे चीनने अरुणाचल प्रदेशातून (Arunachal Pradesh) अपहरण केले असल्याचा दावा केला आहे. तापिर गाओ असं खासदाराचं नाव असून त्यांनी म्हटलं की, अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यातील १७ वर्षांच्या तरुणाचा अपहरण चीनी सैन्याने केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

खासदार तापिर गाओ यांनी म्हटलं की, चीनी सैन्याच्या कैदेतून सुटलेल्या दुसऱ्या एका मुलाने या अपहरणाची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. चीनी सैन्याने केलेल्या अपहरणाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती देण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच सरकारी संस्थांकडून भारतीय तरुणाच्या सुटकेसाठी प्रयत्न व्हावेत यासाठी विनंतीही केली आहे.

पीटीआय़ने दिलेल्या वृत्तानुसार, चिनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यातील भारतीय हद्दीतून तरुणाचे अपहऱण केले आहे. तिथले भाजप खासदार तापिर गाओ यांनी बुधवारी ही धक्कादायक अशी माहिती दिली. मिराम टॅरन असं त्या तरुणाचं नाव असल्याचंही त्यांनी सांगितलं.

indian youth abducted by china army
पाकिस्तानला धडा शिकवा; पीओकेच्या कुटुंबाचे मोदींना आवाहन

चीनी आर्मीने मंगळवारी त्याला सियुंगलामधील लुंगटा जोर भागातून त्याचं अपहरण केलं. याबाबत सुबनसिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात फोन करून याची माहिती दिली. तसंच चीनी सैन्याच्या तावडीतून सुटलेला टॅरनचा मित्र जानी यायिंग यानेही अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com