'इस्रो' अध्यक्ष के. सिवन यांचा विमानातील साधेपणा पाहा; व्हिडिओ व्हायरल!

वृत्तसंस्था
Friday, 4 October 2019

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष के. सिवन हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जाऊ लागले आहेत.

भारताची चांद्रयान-2 मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली नसली, तरी या मोहिमेमुळे भारतीयांच्याच नव्हे, तर अंतराळप्रेमींच्या मनात 'इस्रो'बद्दलचा अभिमान कैकपटीने वाढला. तसेच जगातील अनेक देशांना भारताची अंतराळक्षेत्रातील प्रगती पाहून नवी उमेद मिळाली आहे. 

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांची लोकप्रियतेतही या मोहिमेनंतर वाढ झाली आहे. लहानांपासून ते अगदी सेलेब्रिटीपर्यंत सर्वजण आता सिवन यांचे फॅन झाले आहेत. सगळीकडे सध्या इस्रो आणि सिवन यांच्याच चर्चा ऐकायला मिळत आहेत.  
के. सिवन यांची लोकप्रियता कुठपर्यंत पोहोचली आहे, याची प्रचिती येणारा ट्विटरवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

के. सिवन हे विमानाने प्रवास करत असतानाचा हा व्हिडिओ एका प्रवाशानेच शूट केला आहे. प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी एक पोस्ट ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे. विमान प्रवासाची सेवा देणाऱ्या इंडिगो कंपनीच्या एका विमानाने सिवन प्रवास करत असतानाचा हा व्हिडिओ आहे.

भारताची जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोचे अध्यक्ष के. सिवन हे आपल्यासोबत प्रवास करत आहेत. यामुळे आश्चर्यचकित झालेल्या एका एअरहोस्टेसने सर्व विमानप्रवाशांना सिवन यांची ओळख करून दिली. त्यानंतर सिवन यांनी सर्वांना अभिवादनही केले. यावेळी एअरहोस्टेस यांना सिवन यांच्याशी सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. 

विशेष गोष्ट म्हणजे सिवन हे इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत होते. भारताची प्रमुख अंतराळ संशोधन संस्था असलेल्या इस्रोचे अध्यक्ष असूनही सिवन यांनी प्रवासासाठी इकॉनॉमी क्लास निवडला, याबद्दल नेटकऱ्यांनी त्यांना सलाम केला आहे.

आतापर्यंत सेलेब्रिटी, क्रिकेटर्सनाच असे रिसेप्शन मिळत होते. मात्र, सिवन यांच्यामुळे या सर्वांना फाटा मिळाला आहे. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष के. सिवन हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जाऊ लागले आहेत. आता भारतात नक्की बदल होत आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'पक्षाने चांगला निर्णय घेतला'

- Vidhan Sabha 2019 : बघताय काय रागानं? TikTok स्टारला तिकीट दिलंय भाजपनं!

- Video : पुण्यात आली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indigo Staff Clicks Selfie With ISRO Chairman K Sivan