Indira & Firoz Love Story : इंदिराजी आणि फिरोज यांच्या प्रेमालाही झाला होता विरोध!

कशी होती इंदिराजी आणि फिरोज यांची लव्ह स्टोरी?
Indira Gandhi & Firoz Lovestory
Indira Gandhi & Firoz Lovestory esakal

देशाच्या स्वातंत्र्य होण्याच्या काळात देशात अनेक प्रेमकथा जन्म घेत होत्या. त्याचाच एक भाग होता देशाची आयर्नलेडी पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिरोझ गांधी यांच्या प्रेमकहाणी. आज या दोन दिग्गजांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यानिमित्तानेच आज त्यांच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेऊयात.

इंदिरा-फिरोझ यांच्या प्रेमकहाणीत स्वतंत्र्याची चळवळ खुप महत्त्वाचा भाग आहे. 1930 साल उजाडलं होतं. नवं रक्त असल्यामुळे साहजीकच फिरोजही स्वातंत्र्यलढ्याकडे आकर्षित झाले. त्यात एक चेहरा होता फिरोज खान दारूवाला यांचा. ते गुजरातमधील असून पारशी कुटुंबातील होते.

Indira Gandhi & Firoz Lovestory
Indira Gandhi Birth Anniversary: शिक्षण घ्यावे पण परीक्षा कशाला? इंदिरा गांधींची ती खास गोष्ट...

तो काळ स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांसाठी खडतर होता तसाच तो त्यांच्या मुलांसाठीही होता. एकीकडे देशाचे होणारे पंतप्रधान पंडीत नेहरू इंग्रजांविरूद्ध देशात एकजूट होण्यासाठी लढत होते तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी कमलाजी ही चळवळीत अग्रेसर होत्या. त्यामुळे कोवळ्या वयातील इंदिराजींना त्यांचा फार कमी सहवास लाभला.  

इंदिराजी आणि फिरोज
इंदिराजी आणि फिरोजesakal
Indira Gandhi & Firoz Lovestory
Rahul Gandhi: राजघाटावर राहुल गांधी यांचा आज सत्याग्रह; प्रियांका गांधींनी घेतली मोठी जबाबदारी

6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला आणि मिठाचा कायदा मोडला. त्यानंतर 14 एप्रिलला पंडित नेहरुंना अटक करण्यात आली. नेहरुंना अटक केल्यामुळे देशभरात आंदोलन चिघळलं महिला उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. नेहरू यांच्या अटकेनंतर कमलाजींचा आंदोलनात सहभाग वाढला.

त्यावेळी फिरोझही फक्त कमला यांच्या आंदोलनांचे निरीक्षण करत होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात कमला जखमी झाल्यानंतर यांचे रक्षण करण्यासाठी फिरोझ धावून गेले आणि येथेच पहिल्यांदा फिरोझ आणि नेहरु घराण्याचा प्रत्यक्ष संबंध आला. 

Indira Gandhi & Firoz Lovestory
Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!

याच काळात फिरोजनेही इंदिरा आपल्याला आवडत असल्याचं कमला यांना सांगितलं. यावेळी मात्र, कुठलाही त्रागा न करता कमला यांनी फिरोजचं म्हणणं ऐकलं. फिरोजची हीच भावना कमला यांनी इंदिरा यांना कळवली. ‘फिरोझला तू आवडतेस’ असं कमला इंदिराजींना म्हणाल्या. पण इंदिरा यांना फिरोझमध्ये काही रस नसल्याचं कमला यांना दिसलं आणि इंदिरा अजून खूप लहान आहे, असं उत्तर त्यांनी फिरोझला दिलं.

Indira Gandhi & Firoz Lovestory
Propose Day 2023 : प्रेम करावं तर नेताजी आणि एमिलीसारखं; दुरावा असूनही शेवटपर्यंत निभावलं जाणारं!

रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनमध्ये 1933 मध्ये असताना इंदिरा सोळा वर्षांची होती. याच काळात फिरोझ गांधी यांनी इंदिरा यांना पत्र लिहून तिला आणखी एकदा लग्नाची मागणी घातली होती. त्याला उत्तर म्हणून मला तुझ्याशी किंवा इतर कोणाशीही लग्न करण्याचा विचार नाही. असं इंदिरा यांनी फिरोझला स्पष्टपणे कळवलं होतं.

Indira Gandhi & Firoz Lovestory
VIDEO :ह्रदयद्रावक! साथीदाराचा विरह सहन होईना; मोराच्या विरहात लांडोरचा आकांत..प्रेमकथा वाचाच!

इंदिरांच्या सोळाव्या वर्षीच फिरोझ यांनी तिला लग्नाची मागणी घातली होती. असे असले तरी इंदिरा फिरोझला टाळतच आल्या होत्या. मात्र, पॅरिसमधील साक्रेकरच्या चर्चसमोर फिरोझच्या आयुष्यात इंदिराचा प्रवेश झाला. इंदिरा यांनी फिरोझ यांना पॅरिसमधील साक्रेकरच्या चर्चसमोर होकार दिला. दोघांचीही मनं जुळल्यानंतर दोघेही पॅरिसमध्ये मनसोक्त फिरले होते.

 

इंदिराजी आणि फिरोज यांच्या विवाहातील एक क्षण
इंदिराजी आणि फिरोज यांच्या विवाहातील एक क्षणesakal
Indira Gandhi & Firoz Lovestory
Valentines Day 2023 : व्हॅलेंटाइन डे’ अन् 20 जण अडकणार लग्नाच्या बेडीत!

 नेहरूंचा लग्नाला विरोध

इंदिराजींनी होकार दिला खरा पण खरी परिक्षा तर तेव्हा होती जेव्हा वडील पंडित नेहरु यांची परवानगी घेणे. फिरोझ आणि इंदिरा लग्न करण्यावर ठाम होते. त्यांच्या या निर्णयामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. पण, लेकीच्या हट्टापुढे ते जास्तवेळ नकार देऊ शकले नाहीत.

Indira Gandhi & Firoz Lovestory
Indira Gandhi Birth Anniversary: खरंच इंदिरा गांधी दोषी होत्या का? वाचा काय होतं गूढ नगरवाला प्रकरण

 त्याकाळी हिंदू आणि पारशी हे वेगवेगळ्या धर्मातील लग्नाने भारतीय राजकारणात वादळ येऊ नये म्हणून महात्मा गांधी यांनी फिरोज खान दारूवाला यांना गांधी हे आडनाव उपाधी म्हणून दिले.  

Indira Gandhi & Firoz Lovestory
Indira Gandhi : हत्येच्या काही काळ आधीच राहुल गांधी आजींना भेटले होते

दोघांच्या लग्नाबद्दल बोलताना संपूर्ण देश् आमच्या लग्नाच्या विरोधात आहे, असं इंदिरा यांनी म्हटलं होतं. दरम्यान, इंदिरा-फिरोझ यांनी 16 मार्च 1942 रोजी रामनवमीच्या दिवशी लग्न केलं.

इंदिरा गांधी जेव्हा कधी गुजरातमध्ये प्रचारासाठी जात तेव्हा त्या डोक्यावरून साडीचा पदर खाली पडू द्यायच्या नाहीत. त्या नेहमीच आपण गुजरातची सून असल्याचे अभिमानाने सांगायच्या. 

Indira Gandhi & Firoz Lovestory
Indira Gandhi Birth Anniversary: खरंच इंदिरा गांधी दोषी होत्या का? वाचा काय होतं गूढ नगरवाला प्रकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com