दातृत्व! इंदुर दुर्घटनेतील पीडितांचा मोठा निर्णय; मृतांचे केलं नेत्र अन् अवयदान

indore temple tragedy
indore temple tragedy

भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूरमधील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात गुरुवारी रामनवमीनिमित्त आयोजित हवनाच्या वेळी प्राचीन विहिरीचे छत कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात प्राण गमावलेल्या 9 जणांच्या नातेवाईकांनी मृतांचे डोळे आणि अवयव दान केली आहे.

indore temple tragedy
Delhi Crime : दिल्लीत गुन्हेगारीचा कहर! दिवसाढवळ्या वकिलाची गोळ्या झाडून हत्या

यापैकी सर्व नऊ जणांचे डोळे दान करण्यात आले, तर चार जणांच्या नातेवाइकांनी नेत्रदानासोबतच अवयवदानाचा निर्णय घेऊन आदर्श घालून दिला आहे.

अपघातात प्राण गमावलेल्या मधु भस्मानी, भारती कुकरेजा, कनक पटेल, लक्ष्मी बेन पटेल आणि दक्षा बेन पटेल यांच्या नातेवाईकांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला, तर भूमिका खानचंदानी, जयंतीबाई, नितीन गंगवाल आणि इंद्रकुमार हरवाणी यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदान केले.

indore temple tragedy
Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचार नियोजित? नेमकं काय घडलं? इम्तियाज जलीलांचा गौप्यस्फोट

बेलेश्वर महादेव मंदिराच्या ६० फूट खोल बावडीतून ३६ मृतदेह सापडले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सेवाराम गलानी, सचिव श्रीकांत पटेल आणि कुमार सबनानी यांच्याविरोधात भादंवि कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com