नरेंद्र मोदी- बोरिस जॉन्सन भेट; महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

दोन्ही देशांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीचाही निश्चिय केला.
PM Narendra Modi and Boris Johnson
PM Narendra Modi and Boris Johnsongoogle

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्यात एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी विविध क्षेत्रांतील प्रगतीबाबत चर्चा झाली. एएनआयच्या माहितीनुसार दोन्ही देशांनी सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही देशांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीचाही निश्चिय केला.

PM Narendra Modi and Boris Johnson
सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे; नरेंद्र मोदी

सुरक्षा खरेदीसाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी इंग्लंडतर्फे विशेष लायसन्स तयार केले जात असल्याची माहिती बोरिस यांनी दिली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामंजस्य अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपले संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी सर्व बाजूंनी प्रयत्न केले आहेत. वायू, अवकाश आणि समुद्रमार्गे होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले.

हिंद-प्रशांत क्षेत्र खुले ठेवण्यात दोन्ही देशांचे हीत आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात नियमाधारित परिवहनासाठी दोन्ही देश काम करणार आहेत, असे बोरिस यांनी सांगितले. भारतात झालेल्या विशेष स्वागतामुळे ते खूष झाले होते. त्यांना सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन असल्यासारखे वाटले.

PM Narendra Modi and Boris Johnson
Video: इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर

सायबर क्षेत्रातील नव्या प्रकारचे हल्ले परतवून लावण्यासाठी एकत्र काम करण्यावर दोन्ही देश सहमत झाले आहेत. इंग्लंड लढाऊ विमानांसाठी नव्या जेट प्रौद्योगिकीसह समुद्री क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थाही बळकट करणार आहे; जेणेकरून हल्ल्यांना तोंड दिले जाऊ शकते. दोन्ही देशांनी नव्या आणि विस्तारित सुरक्षा सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' या उपक्रमालाही चालना मिळणार आहे.

PM Narendra Modi and Boris Johnson
PM नरेंद्र मोदींनी केली बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवर चर्चा

दोन्ही देशांमध्ये झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन यांनी एफटीए प्रकरणावर चर्चा केली. व्यापार, रोजगार, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश व अन्य तंत्रज्ञानावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. युक्रेनबाबतही चर्चा झाली. लवकरात लवकर हा वाद मिटून जगात शांतता नांदावी अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com