PM नरेंद्र मोदींनी केली बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवर चर्चा

Narendra Modi and Boris Johnson
Narendra Modi and Boris JohnsonNarendra Modi and Boris Johnson

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी (ता. २२) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्याशी फोनवर युक्रेनमधील परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी वाद संपवून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत यावे यासाठी भारताच्या सततच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मी युक्रेनमधील भीषण परिस्थितीबद्दल बोललो आणि त्याच्या सार्वभौमत्वाचा आदर केला जावा यावर सहमत झालो. ब्रिटन आणि भारताचे संबंध आणखी मजबूत होत आहेत. आम्ही आगामी काळात आमचे व्यापार, सुरक्षा आणि व्यावसायिक संबंध मजबूत करू, असे ट्विट ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी केले.

Narendra Modi and Boris Johnson
नितीन गडकरी म्हणाले, वाढत्या पेट्रोलचे टेन्शन संपले, कारण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवर चर्चा केली. पीएम मोदी यांनी समकालीन जगाचा आधार म्हणून आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व राज्यांची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व याविषयी भारताच्या विश्वासावर जोर दिला. तसेच पीएम मोदींनी सर्व पक्षांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करण्यास सांगितले, असे भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये गेल्यावर्षी झालेल्या आभासी शिखर परिषदेदरम्यान स्वीकारण्यात आलेल्या ‘इंडिया-यूके रोडमॅप २०३०’च्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचेही मोदींनी कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) परस्पर सोयीनुसार पंतप्रधान जॉन्सन यांचे भारतात लवकरात लवकर स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली.

Narendra Modi and Boris Johnson
दिल्लीत राजकीय ‘नायक’; गटार साफ केल्यानंतर नेत्याची दुधाने आंघोळ

सहकार्य वाढविण्याच्या क्षमतेवर सहमती

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय हितसंबंधांच्या मुद्द्यांवरही चर्चा केली आणि व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा आणि लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रात सहकार्य आणखी वाढविण्याच्या क्षमतेवर सहमती दर्शवली. द्विपक्षीय मुक्त व्यापार करारावर सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये सकारात्मक गती आल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com