Indian Economy : जगभरात मंदी पण तरीही सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Economy
Indian Economy : जगभरात मंदी पण तरीही सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत

Indian Economy : जगभरात मंदी पण तरीही सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत

जगात मंदीचं सावट तरीही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तवताना तो ६.८ टक्के राहणार आहे.

हेही वाचा: Nirmala Sitaraman : एका हातात देशाची अर्थव्यवस्था, दुसऱ्या हातात भाजीपाला; अर्थमंत्री गेल्या मंडईत

भारतीय रिझर्व बँकेने २०२२ - २३ या आर्थिक वर्षांमध्ये भारताचा विकासदर ७ टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. नाणेनिधीच्या अहवालानुसार, चीनचा विकासदर भारताच्या विकासदरापेक्षा कमी आहे. चीनचा विकासदर २०२१मध्ये ८.१ टक्के होता, २०२२ मध्ये तो ३.२ टक्क्यांपर्यंत घसरला होता. या अहवालात २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठी चीनचा विकासदार ४.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा: Indian Economy : काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल : अमित शाह

नाणेनिधीच्या या अहवालानुसार, कोरोनामुळे निर्माण झालेली आव्हानं अजूनही संपलेली नाहीत. रशिया युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या समस्याही सध्या आहेत. देशातल्या अर्थव्यवस्थेसमोर महागाई आणि बेरोजगारी ही सर्वात मोठी आव्हानं आहेत.

टॅग्स :economyIMFIndian Economy