आंतरराष्ट्रीय उड्डाणे उद्यापासून ‘अनलॉक’

Plane-
Plane-

नवी दिल्ली - कोरोना लॉकडाउनमुळे बंद झालेली फ्रान्स व अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा १८ जुलैपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून १ ऑगस्टपर्यंत एअर फ्रान्सच्या सहकार्याने दिल्ली, मुंबई व बंगळुरूहून पॅरिससाठी २८ उड्डाणे करण्यात येतील,अशी माहिती नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जर्मनी व अमेरिकेतील विमान कंपन्यांनीही भारतातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे, असेही ते म्हणाले. कोविड-१९ च्या उद्रेकापूर्वी देशांतर्गत विमानसेवा सुरू होती. त्याच्या किमान ५५ ते ६० टक्के उड्डाणे दिवाळीपर्यंत पूर्ववत सुरू होतील, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की अमेरिकी कंपन्यांची १८ विमाने १७ ते ३१ जुलैपर्यंत भारतात येतील. कोरोना काळात २३ मार्चपासून विमानसेवा बंद झाली. वंदे भारत योजना वगळता आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक पूर्ण बंद आहे. वंदे भारत अंतर्गत आतापावेतो ८० हजार भारतीयांना विदेशातून परत आणण्यात आले आहे. यात दुबई व संयुक्त अरब अमिरातीतील सर्वाधिक प्रवासी असून अमेरिकेतील ३० हजार भारतीयांनाही मायदेशी आणण्यात आल्याची माहिती पुरी यांनी दिली.

गोयल यांच्या सूचना 
रेल्वेने उत्पन्नस्त्रोत पुन्हा वाढविण्यासह खर्च कमी करण्याचे उपाय युद्धपातळीवर अंमलात आणावेत, अशी सूचना रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे उच्चाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली आहे. कोरोनामुळे मार्चपासून बंद असलेल्या रेल्वेच्या उत्पन्नातही मोठा खड्डा पडला आहे. या काळात मालवाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता. १५ ऑगस्टपर्यंत प्रवासी रेल्वेगाड्या नियमितपणे सोडण्याची रेल्वेची योजना नाही. त्यामुळे उत्तपन्नातील घाटा कमी करण्यासाठी काटकसरीचे उपाय करणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीची तांत्रिक तयारी करणे आदींबाबतही गोयल यांनी सूचना केल्या.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com