आंतरराष्ट्रीय शाळांची लोकप्रियता वाढतेय; भारताकडे वाढता कल

गेल्या 10 वर्षात भारतातील आंतरराष्ट्रीय शाळांची लोकप्रियता वाढली आहे
Global schools queue up to start their India chapters
Global schools queue up to start their India chapterssakal

मुंबई: भारत हा परदेशी शाळांसाठी उत्तम पर्याय बनलाय. या परदेशी शाळांना आपले अस्तित्व कॅम्पसच्या पलीकडे वाढायचे आहे.सुरवातीला इंग्लंडमधील मिलफिल्ड स्कूलने गुजरातमधील ध्रंगध्रा येथील महाराजांच्या मुलांसाठी शाळा स्थापन केली होती आता ही मिलफिल्ड स्कूल पुन्हा पुनरागमन करत आहे (Global schools queue up to start their India chapters)

भारतात प्रवेश करणारी ती एकमेव शाळा नाही. यूके हॅरो स्कूलनेसुद्धा सप्टेंबर 2023 मध्ये हॅरो इंटरनॅशनल स्कूल बंगळूमध्ये उघडण्यासाठी एमिटी एज्युकेशन ग्रुपसोबत भागीदारी केली आहे आणि त्यानंतर यूकेचे वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे देखील सुरू होणार आहे. US रटगर्स प्रेप स्कूल (Rutgers Prep School) इडोव्यु वेनट्युर्स (Edovu Ventures) च्या भागीदारीत, सप्टेंबर 2023 मध्ये भारतात लखनऊ, गाझियाबाद, गुरुग्राम आणि जयपूरमध्ये चार अमेरिकन एज्युग्लोबल शाळा उघडण्याची योजना आखत आहे. (International schools in India have grown in popularity over the past 10 years)

Global schools queue up to start their India chapters
दारूच्या नशेत 2 पुरुषांनी केलं लग्न! शुद्धीत आल्यावर...

इंग्लंडमधील मिलफिल्ड स्कूलने भारतात त्यांची शाळा सुरु करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.“आम्ही येथे रिसर्च टूरसाठी आलोत तसेच मिलफिल्डची गरज समजून घेण्यासाठी आमच्या विश्वासू माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत. आमच्याकडे दुसरे पर्याय नाही, पण भूतकाळापासून आमच्यात असलेल्या मजबूत संबंधामुळे भारतापासून सुरुवात करणे आम्हाला योग्य वाटते,” असे मिलफिल्ड स्कूलचे मुख्याध्यापक गॅविन हॉर्गन म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “आम्हाला वाटते की भारतीय पालक सर्वांगीण शिक्षणाला जास्त महत्त्व देतात "

Global schools queue up to start their India chapters
टॉर्च अन् मेणबत्तीच्या प्रकाशात आईने दिला बाळाला जन्म

ISC रिसर्च मार्केट इंटेलिजन्स रिपोर्ट नुसार, गेल्या 10 वर्षात भारतातील आंतरराष्ट्रीय शाळांची लोकप्रियता वाढली आहे कारण भारतातील पालकांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या फायद्यांची जाणीव झाली आहे.

Global schools queue up to start their India chapters
दारूच्या नशेत 2 पुरुषांनी केलं लग्न! शुद्धीत आल्यावर...

आयएससी रिसर्चचे संचालक सॅम फ्रेझर म्हणतात, “कोरोनामुळे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भारतीय मध्यमवर्गांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे फायदे झाल्याचे दिसून येत आहेत. वेलिंग्टन कॉलेज, हॅरो स्कूल आणि रटगर्स भारतात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक गुंतवणूक आणि विकासामध्ये नवीन स्वारस्य निर्माण करण्याचा मार्ग मोकळा करत आहेत. "

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com