
यंदा १५० ऐवजी २०० आयपीएस ची भरती, मंत्र्यांचा दावा
भारतीय पोलीस सेवेतील भरतीची संख्या सिव्हील सेवा परीक्षेपासून 150 वरून 200 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी मंगळवारी लोकसभेत (Loksabha) दिली.
हेही वाचा: UPSC : नागरी सेवा परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू
जनगणनेवर बोलताना ते म्हणाले, "जनगणना 2021चे आयोजन कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. आतापर्यंत, सरकारने राष्ट्रीय स्तरावर भारतीय नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी तयार करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही" सोबत 2021 च्या भारतीय जनगणनेच्या अभ्यासासाठी सरकारने 8754.23 कोटी रुपयांचे वाटप मंजूर केल्याची माहितीही राय यांनी दिली. (IPS Recruitments News Updates)
हेही वाचा: माझ्यावर गोळ्या झाडणारे गोडसेचे वंशज - असदुद्दीन ओवेसी
सरकार जातीवर आधारित जनगणनेचा विचार करत आहे का या प्रश्नावर नित्यानंद राय म्हणाले, "भारत सरकारने स्वातंत्र्यानंतरच्या जनगणनेमध्ये SC आणि ST व्यतिरिक्त इतर जातीनिहाय लोकसंख्येची गणना केलेली नाही." गेल्या पाच वर्षांत ४,८४४ लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
Web Title: Ips Recruitments Increased Nityanand Rai Informed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..