
पंजाबमध्ये ‘लष्कर-ए-खालसा’ गट स्थापन; आयएसआयचा मोठा कट?
पंजाबमधील दहशतवादी घटनांसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने (ISI) नव्या नावाने दहशतवादी गट तयार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या दहशतवादी गटाचे नाव ‘लष्कर-ए-खालसा’ (Lashkar-e-Khalsa) असे ठेवण्यात आले आहे. या दहशतवादी गटात सामील असलेल्या लोकांना अफगाण फायटरकडून प्रशिक्षण दिले जात आहे. (ISI sets up Lashkar-e-Khalsa group in Punjab)
आज तकने दिलेल्या माहितीनुसार, ‘लष्कर-ए-खालसा’मध्ये अफगाण दहशतवाद्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अफगाण दहशतवाद्यांना आरपीजीसह सर्व आधुनिक शस्त्रे चालवण्याचा अनुभव असल्याचे दिसून आले आहे. या गटाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याचा कट रचला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: तजिंदर बग्गांचा अरविंद केजरीवालांवर हल्ला; शंभर जोडेही खाल्ले...
पंजाब-हरयाणातील (Punjab) स्थानिक गुंड आणि गुन्हेगारांचा या दहशतवादी (Terrorist) गटात समावेश करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची बातमी आहे. ज्यामध्ये ड्रग्जच्या माध्यमातून कमाई करण्याचे आमिष दाखवून त्यांचा समावेश करण्याचा कट रचला जात आहे.
पंजाबमधील (Punjab) मोहाली येथील पोलिस गुप्तचर मुख्यालयाच्या इमारतीत सोमवारी सायंकाळी उशिरा स्फोट झाला. आता या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका कारमधून दोन संशयित व्यक्ती येताना दिसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ज्याने सुमारे ८० मीटर अंतरावरून रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड डागला.
हेही वाचा: गहू ठरवणार PM मोदींची जगातील विश्वासार्हता; वाचा ते कसे?
स्फोटानंतर पंजाब हाय अलर्टवर
स्फोटानंतर पंजाब (Punjab) हाय अलर्टवर आहे. ज्या इमारतीत स्फोट झाला त्या इमारतीभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इंटेलिजन्स ब्यूरोकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. मात्र, पंजाब पोलिसांनी याला दहशतवादी (Terrorist) घटना असल्याचे दुजोरा दिलेला नाही. हा छोटासा स्फोट होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पंजाबमध्ये धुमाकूळ घालण्याचे कारस्थान!
पंजाबमधील मोहाली येथील इंटेलिजन्स बिल्डिंगमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पंजाबमध्ये धुमाकूळ घालण्याचे पाकिस्तानी कारस्थान सुरू असल्याची बातमी आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने (ISI) लष्कर-ए-खालसा नावाचा एक गट तयार केला आहे.
Web Title: Isi Sets Up Lashkar E Khalsa Group In Punjab
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..