कर्नाटकात आढळल्या इसिसच्या दोन छावण्या; ‘एनआयए’ने दिली धक्कादायक माहिती

वृत्तसंस्था
Monday, 5 October 2020

गेल्या वर्षी बंगळूरचा मेहबूब पाशा आणि तामिळनाडूच्या कुडलोर येथील ख्वाजा मोदीन यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अटक केली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान बरीच माहिती उघड झाली होती.

बंगळूर : गुंडलूपेट, शिवनसमुद्र येथे जागतिक दहशतवादी संघटना इसिसचे भारतीय रुप असलेल्या अल्-हिंदच्या छावण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इसिसची दक्षिण भारतात बस्तान बसविण्याची योजना आहे. या अतिरेक्‍यांनी गुंडलूपेट आणि शिवनसमुद्र जंगलात प्रशिक्षण घेण्याची तयारी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रात ही माहिती दिली आहे. त्यांनी कोडगू आणि कोलारसह अनेक जिल्ह्यात हिंदू नेत्यांच्या हत्त्येनंतर जंगलात लपण्याची योजना आखली आहे.

इसिस दहशतवादी संघटनेचे भारतीय मॉडेल असलेल्या अल्-हिंदने कोडगू आणि कोलारसह कर्नाटकातील काही जिल्ह्यांसह दक्षिण भारतात आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी विस्तृत योजना आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संघटनेत भरती केलेल्या नवीन अतिरेक्‍यांना मंड्या जिल्ह्यातील शिवनसमुद्र आणि चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलूपेट येथे वनात कसे राहायचे, याबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी आवश्‍यक साधने तयार केली असल्याची बाबही देखील उघडकीस आली आहे.

काँग्रेसला उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवायचीय; योगींचा गंभीर आरोप​

गेल्या वर्षी बंगळूरचा मेहबूब पाशा आणि तामिळनाडूच्या कुडलोर येथील ख्वाजा मोदीन यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अटक केली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान बरीच माहिती उघड झाली होती. १४ जुलैला एनआयएने १७ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. दिल्लीस्थित इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
अल-हिंद दहशतवाद्यांनी देश आणि राज्यातील हिंदू नेते, धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची हत्या करण्याची योजना आखली होती, असे एनआयएने माहिती दिली आहे. अल-हिंद दहशतवाद्यांनी कर्नाटकातील कोडगू, कोलार, केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर, पश्‍चिम बंगालमधील बुद्रवन येथे आपले तळ स्थापन करण्याची योजना आखली आहे, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

बागेत सापडलेल्या एका वस्तूने केरळला जोडलं थेट रोमन साम्राज्याशी​

बंगळूरमध्ये एनआयएने ताब्यात घेतलेल्या मेहबूब पाशा आणि तामिळनाडूच्या कुडलोर येथील ख्वाजा मोईद्दीन यांना ताब्यात घेतले. हिंदू धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींच्या हत्येनंतर अल-हिंद दहशतवाद्यांनी जंगलात लपून राहण्याची योजना आखली होती. तसा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही हातपाय पसरले
कर्नाटकातील कोडगू, कोलार त्याबरोबच शेजारच्या राज्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. केरळ त्याबरोबरच महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि पश्‍चिम बंगालमधील बुद्रवन येथे दहशतवाद्यांनी बस्तान बसविण्याची जय्यत तयारी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISIS India module Al Hind plotted to build province inside jungles of South India says NIA