काँग्रेस आता फक्त भाऊ-बहिणीचा पक्ष; जे.पी.नड्डांचा खोचक टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

'देशातले सर्व प्रादेशिक पक्ष आता पारिवारिक पक्ष झाले आहेत'

काँग्रेस आता फक्त भाऊ-बहिणीचा पक्ष; जे.पी.नड्डांचा खोचक टोला

सध्या देशातील राजकारणात दिवसेंदिवस अनेक घडामोडी घडत आहेत. अगामी वर्षाअखेरीस गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. केंद्रीय भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हे सध्या अहमदाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी कॉंग्रसेवर निशाणा साधला आहे. काँग्रेस हा आता फक्त भाऊ-बहिणीचा पक्ष राहिल्याची टीका जे.पी नड्डा यांनी केली आहे.

अहमदाबाद येथील जीडीएमसी सेंटरमध्ये नड्डांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी ते म्हणाले, देशातले सर्व प्रादेशिक पक्ष आता पारिवारिक पक्ष झाले आहेत. सध्या देशात कोणताही राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. भाजप हा एकमेव पक्ष सध्या राष्ट्रीय पक्ष राहिला आहे. सध्या काँग्रेस फक्त दोन राज्यांमध्ये अस्तित्वात आहे. ही परिस्थितीही बदलणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष ना भारतीय, ना राष्ट्रीय पक्ष असून तो फक्त आता भावा-बहिणीचा पक्ष राहिला आहे, असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा: रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, म्हणाल्या..

पुढे देशातील प्रादेशिक पक्षांच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना ते म्हणाले, जम्मू काश्मीरमधील नॅशन कॉन्फरन्स, पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस हे सर्व पक्ष आता पारिवारिक पक्ष झाले आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूतही अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पारिवारिक पक्ष झाल्याचं नड्डांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर असलेल्या नड्डा यांनी आज भाजप आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गांधीनगर, वडोदरा आणि अहमदाबाद अशा तीन शहरांमध्ये नड्डा यांनी भेट देऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला.

हेही वाचा: 'बाबरी मस्जिद पाडताना राज ठाकरेंच माहीत नाही, उद्धव ठाकरे मात्र कॅमेरा साफ करत होते'

Web Title: J P Nadda Criticism On Congress Rahul Gandhi And Priyanka Gandhi Only Party Brother Sister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top