पंतप्रधान मोदी यांचे पुन्हा ‘जय जवान’!

PM_Narendra_Modi
PM_Narendra_Modi

नवी दिल्ली : मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्या २६ नोव्हेंबर या दिवशीच देशात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या जैशे महंमदच्या चौघा दहशतवाद्यांना जम्मू-काश्‍मीरमध्ये कंठस्नान घालणाऱ्या आणि दिल्लीत त्याच गटाच्या दोन दहशतवाद्यांची धरपकड करणाऱ्या सुरक्षा दलांच्या शौर्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.२०) मुक्तपणे प्रशंसा केली. मोदी यांनी दिल्लीसह देशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

मोदी यांनी शुक्रवारी दुपारी घेतलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवाल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला सहभागी झाले होते. या बैठकीत दिल्ली व इतर महानगरांतील संवेदनशील भागांत सुरक्षेचा वेढा आवळण्याची व दहशतवादी हल्ल्याचा धोका असणाऱ्या राज्यांच्या सीमांवर अतिरिक्त गस्तीपथके तैनात करण्याची सूचना करण्यात आली. पंतप्रधानांनी ट्विटद्वारेही जवानांच्या शौर्याची प्रशंसा केली.

मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या कारवाया हाणून पाडून भारतीय जवानांनी पुन्हा आपल्या शौर्याचे प्रदर्शन जगाला घडविले, असे पंतप्रधानांनी म्हटले. त्यांनी हेही नमूद केले की सध्या पाकिस्तानात असलेल्या जैशे महंमदच्या चार दहशतवाद्यांचा खातमा करणे व मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, दारूगोळा हस्तगत करत आमच्या जवानांनी मोठा संभाव्य संहार टाळला आहे. आमच्या सुरक्षा दल जवानांनी पुन्हा एकदा जबरदस्त शौर्य दाखविले आहे.

‘रुपे कार्ड-२’चे उद्‌घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांच्यासह दुसऱ्या टप्प्यातील रूपे कार्डचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन केले. कोरोनाच्या या संकटकाळात भारत आपल्या शेजारी मित्रांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यामुळे भूतानचे डेबीट-क्रेडिट कार्डधारक भारताच्या रूपे नेटवर्कचाही उपयोग करू शकतील. मोदी यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये आपल्या भूतान दौऱ्यात रूपे कार्डच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन केले होते.

- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com