Prisoner Yoga : जम्मूतील दोडा जिल्ह्यातील भदेरवाह तुरुंगातील कैद्यांना देणार योगसाधनेचे धडे

दहा दिवसांच्या योगशिबिरामागे कैद्यांनी नैराश्यावर मात करण्यात योगसाधनेचे धडे दिले जात आहेत.
Bhaderwah jail
Bhaderwah jail esakal

भदेरवाह : योगसाधनेचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. हे लक्षात घेऊन जम्मूतील दोडा जिल्ह्यातील भदेरवाह तुरुंगातील कैद्यांना योगसाधनेचे धडे दिले जात आहेत.

या दहा दिवसांच्या योगशिबिरामागे कैद्यांनी नैराश्यावर मात करण्यात मदत व्हावी तसेच अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती व्हावी, हे दोन प्रमुख हेतू आहेत. ‘आयुष’ मंत्रालयाच्या पुढाकारातून घेतल्या जाणाऱ्या या शिबिरास आजपासून सुरुवात झाली.

अमली पदार्थांचे निर्मूलन करण्यासाठी आयुष मंत्रालय समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. ‘नशामुक्त भारत अभियान’ या उपक्रमांतर्गत भदेरवाहमधील कैद्यांसाठी हे शिबिर घेतले जात आहे. ‘योगाला होकार, अमली पदार्थांना नकार’ असे या

अभियानाचे घोषवाक्य आहे. योग प्रशिक्षिका निधी पाधा यांनी आज योगशिबिराच्या पहिल्या दिवशी कैद्यांना विविध योगासने शिकविली. त्याचप्रमाणे पाधा यांनी कैद्यांना मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त टिप्स दिल्या. त्याचा कैद्यांमधील नकारात्मकता कमी होऊन अमली पदार्थांना नकार देण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये निर्माण होण्यात मदत होईल.

Bhaderwah jail
Desh : भूकंपग्रस्तांसाठी ‘नासा’चा पुढाकार

योग प्रशिक्षिका निधी पाधा म्हणाल्या, की नियमित योगसाधनेमुळे कैद्यांना नैराश्यावर मात करण्यात मदत होईल. त्याचप्रमाणे, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठीही योगसाधना उपयुक्त ठरेल. योगसाधना त्यांच मन शांत करून त्यांना अधिक चांगला नागरिक बनण्यात मदत करेल, असेही त्यांनी नमूद केले.

Bhaderwah jail
Desh : कर्नाटकाला सहा टीएमसी पाणी द्या ; मुख्य सचिव राकेश सिंग

योगासनांच्या केवळ एका सत्रानंतरच ताण कमी होऊन अधिक सकारात्मकता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक कैद्यांनी दिली. योगशिबिर घेतल्याबद्दलही त्यांनी तुरुंग प्रशासनाचे आभार मानले.

योगसाधनेमुळे कैद्यांमधील ताण नक्कीच कमी होण्यात मदत होईल. विशेषत: स्वत:ची ताकद वाढवून संतुलन, लवचिकता, ध्यान, प्राणायाम आणि निःस्वार्थ कृती आदींच्या माध्यमातून कैद्यांना नकारात्मक विचारांपासून तसेच कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्यात मदत होईल.

- निधी पाधा, योग प्रशिक्षिका

Bhaderwah jail
Desh : दहशतवाद्यांकडून चिलखत भेदणाऱ्या गोळ्यांचा वापर

‘एनडीपीएस’ कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्यानंतर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत मी एक वर्षाच्या नजरकैदेत आहे. मला अमली पदार्थांचे व्यसन लागले होते. मात्र, तुरुंगात योगसाधनेसह घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे माझ्यात सकारात्मक बदल झाले. योगसाधनेचा सराव सुरू ठेवणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com