जंगलात दारु पित बसले, वाघानं केला 'थेट कार्यक्रम', एकाला तर... |Viral News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger News

Viral: जंगलात दारु पित बसले, वाघानं केला 'थेट कार्यक्रम', एकाला तर...

Social media viral news News: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रामनगर मधील जिम कॉर्बेट जंगलातील जीवघेण्या हल्ल्याच्या घटना अजुन संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. आताच्या एका घटनेनं परिसरातील लोकांना हादरवून टाकलं आहे.

रामनगर जिम कॉर्बेट जंगलातील तो परिसर आता प्रवेशासाठी बंद करण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्या घटनेची चर्चा आहे. जिल्हा प्रशासनानं तिथे कलम १४४ लागू केले आहे. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी तीन तरुण त्या भागामध्ये पार्टी करत होते. रात्री उशिरापर्यत त्यांची पार्टी सुरु होती. त्यावेळी एका वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. आणि वाघ एकाला जंगलात घेऊन गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आता त्यांनी तपास सुरु केला आहे.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Viral Video : 'चुराके दिल मेरा...'; पार्टीतील कपलचा डान्स पाहून आजूबाजूचे घायाळ

अजुनपर्यत त्या युवकाचे शव काही पोलिसांना मिळालेले नाही. त्यांचा तपास सुरु आहे. वन विभागानं देखील मोठ्या प्रमाणात शोध घेतला असून त्यांच्या हाती काही लागलेले नाही. शेवटी आज तो मृतदेह पोलिसांना सापडला असून रामनगरमधील लोकांनी त्या युवकाला ओळखले आहे. त्या वाघानं आतापर्यत बारा जणांची जीव घेतला आहे. त्या वाघापासून सावध राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

हेही वाचा: Viral Video : सायकलवाला चाय! दिवसा अभ्यास, रात्री चहा विकणे; तरूणाचा प्रेरणादायी संघर्ष

पिंजरे आणि कॅमेरे देखील लावले आहेत...

नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागानं जंगलामध्ये पिंजरा लावला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं त्याच्या हालचालींवर लक्षही ठेवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या वाघानं स्थानिक नागरिकांना देखील खूप त्रास दिला आहे. मात्र तो वाघ अद्याप पिंजऱ्यात अडकलेला नाही. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. नॅशनल हाय वे वर देखील त्या वाघानं अनेकांच लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: Viral Video : सायकलवाला चाय! दिवसा अभ्यास, रात्री चहा विकणे; तरूणाचा प्रेरणादायी संघर्ष

पर्यटक ऐकाला मागत नाही.....

रामनगर प्रशासन आणि जिम कॉर्बेट पार्क नॅशनल पार्कमधील अधिकाऱ्यांनी अनेकदा या जंगलात येणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याविषयी सुचना दिल्या आहेत. वाघ पाहण्यासाठी या जंगलामध्ये हजारो पर्यटक गर्दी करतात. प्रत्येकाला वाघ बघण्याची उत्सुकता असते. मात्र वाहनातून जेव्हा पर्यटक येतात तेव्हा त्यांचा उत्साह अधिक असतो. ते फोटो काढण्यासाठी धडपड करत असतात. अशावेळी त्यांना सुचना देऊनही ते ऐकायला मागत नाही. शेवटी जंगलातला कायदा वेगळाच असतो हे पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्तानं दिसून आले आहे.

हेही वाचा: Viral Video : 'सपने में मिलती है'; लग्न हॉलच्या बाहेर झोमॅटो डिलीवरी बॉयचा डान्स