नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

नौगाम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. रविवारी रात्री जवानांनी घुसखोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोळीबार करण्यात आला.

श्रीनगर - उत्तर काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये भारतीय लष्करी जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून 2 दहशतवाद्यांना ठार मारले. 

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौगाम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. रविवारी रात्री जवानांनी घुसखोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. घुसखोरी होत असताना पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवरील चौक्यांवर गोळीबार करण्यात येत होता. भारतीय लष्करानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. 

पुँच जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शनिवारी एक जवान हुतात्मा झाला होता. पाकिस्तानी सैन्याने सीमेवरील चक दे बाग आणि खरी करमरा येथील चौक्यांना लक्ष्य केले होते. आता पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा गोळीबार करण्यात येत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: J&K: 2 terrorists killed after Pak fires indiscriminately at Nowgam