esakal | काश्मीरमध्ये भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

J&K Sarpanch A BJP Leader Shot Dead By Terrorists

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका भाजपनेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम भागातील भाजप नेता सरपंच सज्जाद अहमद याची आज (ता. ०६) सकाळी हत्या करण्यात आली.

काश्मीरमध्ये भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका भाजपनेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम भागातील भाजप नेता सरपंच सज्जाद अहमद याची आज (ता. ०६) सकाळी हत्या करण्यात आली. सज्जाद हे भाजपचे कुलगाम जिल्हा उपाध्यक्षही होते. ही हत्या कोणत्या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जम्मू कश्मीर पोलिसांकडे याप्रकरणी कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील काही दिवसांत काश्मीरमध्ये भाजप नेत्यांवर झालेला हा चौथा हल्ला आहे. यापूर्वी ८ जुलै रोजी बांदीपोरामध्ये आतंकवाद्यांनी भाजप नेता शेख वसीम आणि त्यांच्या वडिलांसह भावाचीही गोळ्या घालून हत्या केली होती. शेख वसीम भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. भाऊ आणि वडिलांसोबत एका दुकानात बसले असता वसिम यांच्यावर हा हल्ला झाला होता. ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा त्या ठिकाणी एकही सुरक्षारक्षक हजर नव्हता. या आतंकवादी हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टेंस फ्रंट या नवीन दहशतवादी संघटनेने घेतली होती. पोलिसांनी सांगितले होते की, ही जैश, लश्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्याच सहयोगी संघटना आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वसीमच्या हत्येनंतर वसीमची मृत्यू हा भारतीय जनता पक्षासाठी खूप दुखःदायक असल्याचे म्हटले होते. जूनमध्येही काश्मीरमध्ये कांग्रेस समर्थक सरपंच अजय भारती यांचीही आतंकवादी हल्ल्यात हत्या करण्यात केली होती.

कलम ३७० हटवल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण
जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवण्याच्या निर्णयास काल (ता. ०५) एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे आज सकाळी भाजपच्या नेत्या रुमिसा रफीक यांनी श्रीनगर शहरातील लाल चौक येथे तिरंगा ध्वज फडकावला. अप्रिय घटना रोखण्यासाठी काश्‍मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. श्रीनगर शहरात दोन दिवसांपासून लागू असलेली संचारबंदी हटविण्यात आली. मात्र कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध कायम ठेवले आहेत. 

देशात दोन दिवसांत १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण; आकडा १९ लाख पार

केंद्र सरकारने गेल्या पाच ऑगस्टला जम्मू काश्‍मीरमधून कलम ३७० वगळले होते. त्याचबरोबर जम्मू काश्‍मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आले. यादरम्यान राज्यात निर्बंध लागू केले आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नॅशनल कॉन्फरन्स आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह सुमारे दोनशेहून अधिक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच मोबाईल सेवाही बंद करण्यात आली. मात्र कालांतराने टप्प्याटप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. यानंतर भाजपनेत्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.

loading image