महाराष्ट्रानंतर इथेही तीन पक्ष एकत्र आले अन् घालवली भाजपची सत्ता

वृत्तसेवा
Monday, 23 December 2019

महाराष्ट्रानंतर झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस व जनता दलाच्या आघाडीने भारतीय जनता पार्टीकडून सत्ता हस्तगत केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. यानंतर झारखंडमध्येही तीन पक्षांनी मिळूनच भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

रांची : महाराष्ट्रानंतर झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस व जनता दलाच्या आघाडीने भारतीय जनता पार्टीकडून सत्ता हस्तगत केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. यानंतर झारखंडमध्येही तीन पक्षांनी मिळूनच भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे झारखंडमध्येही धुनष्यबाणामुळेच भाजपचा पराभव झाला आहे. झारखंडमधील महाआघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचे निवडणुक चिन्ह हे शिवसेनेप्रमाणेच धनुष्यबाण आहे. दरम्यान, सकाळी सुरू झालेली मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. 81 जागांपैकी सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजपा 25 तर कॉंग्रेस आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. 

भाजपच्या 'या' खासदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

झारखंड मुक्ती मोर्चाचे निवडणुकीतील चिन्ह धनुष्यबाण होते. त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही धुनष्यबाणामुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने आघाडी करून सरकार स्थापन केल्याने भाजपाला सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. निवडणूक प्रचाराच्या काळातच झारखंडमध्ये भाजपाविरोधी वातावरण असल्याचे सांगण्यात येत होते. यात कॉंग्रेस व जनता दलाबरोबरच झारखंड मुक्ती मोर्चाचा मोठा वाटा आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून 'ही' नावे निश्चित

आघाडीचे नेते म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांची निवड होणार असून तेच मुख्यमंत्री होण्याची शक्‍यता आहे. जनता दलाच्यावतीने तेजस्वी यादव यांनी सोरेन हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले आहे. कॉंग्रेसनेही सोरेन यांच्या नावाला पसंती दिली असल्याने सोरेन मुख्यमंत्री होण्यात कोणतीच अडचण दिसत नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JMM-Congress-RJD alliance set to form government in Jharkhand