भारतीय वंशाचे श्रीनिवासन अमेरिकेत मुख्य न्यायाधीशपदी

भारतीय वंशाचे श्रीनिवासन अमेरिकेत मुख्य न्यायाधीशपदी

नवी दिल्ली : अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ श्री श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीनिवासन हे भारतीय वंशाचे असून, चंदीगड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांची निवड या पदावर झाल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली जाणार आहे.

फेडरल सर्किट न्यायालय हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर येते. आता या न्यायालयाच्या प्रमुखपदी श्रीनिवासन यांची निवड झाली आहे. पद्मनाभन श्रीकांत असे श्रीनिवासन यांचे नाव आहे. श्रीनिवासन हे भारतीय-अमेरिकन आहेत. अमेरिकेच्या न्यायालयातील न्यायाधीशपदावर कार्यरत असणारे 52 वर्षीय श्रीनिवासन दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. 

1970 मध्ये अमेरिकेत स्थायिक

श्रीनिवासन यांचे वडील 1970 मध्ये अमेरिकेच्या कन्सास शहरातील लॉरेन्स येथे स्थायिक झाले. अमेरिकेतच श्रीनिवासन यांचे बालपण गेले.

कायद्याची पदवी

चंदीगडमध्ये जन्मलेल्या श्रीनिवासन यांचे मूळ गाव तमिळनाडूमध्ये आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून उच्च श्रेणीत कायद्याची पदवी मिळवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com