
Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते एका इमारतीवर कोसळलं. या विमानातून २४२ प्रवाशी प्रवास करत होते, त्यापैकी केवळ एकमेव प्रवाशी बचावल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रवाशानं विमानातून बाहेर उडी घेत आपला जीव वाचवलाच पण चक्क स्वतःच्या पायावर चालत तो निघाला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.