पोलिस अधिकाऱयाच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
Tuesday, 15 September 2020

एक महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस चौकीत गेल्यानंतर पोलिस अधिकाऱयाने महिलेसोबत अश्लील संभाषण केले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कानपूर (उत्तर प्रदेश): एक महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस चौकीत गेल्यानंतर पोलिस अधिकाऱयाने महिलेसोबत अश्लील संभाषण केले. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बलात्कार करणाऱयांना नपुंसक करायला हवेः इम्रान खान

कानपूरमधील नर्वल पोलिस स्टेशनमध्ये ही घटना घडली आहे. एक महिला जमिनीची तक्रार घेऊन पोलिस चौकीत गेली होती. दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यात हजर होते. पोलिस अधिकारी रामऔतार महिलेसोबत अश्लिल संभाषण करत असल्याचे ऐकू येत आहे. संभाषणात अधिकारी महिलेला म्हणत आहे की, या वेळी आला तर ब्लाउज फाडून या. मग बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करेन. शिवाय, शिवीगाळ करत अश्लिल भाषा वापरत आहेत. उपस्थितांपैकी एकाने व्हिडिओ कैद केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती मिळताच डीआयजी प्रीतिंदर सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Video: क्रूरतेचा कळस; कुत्र्याला पुलावरुन खाली फेकले

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी दिसत नाही. पण, पोलिस चौकशी दिसत आहे. रामऔतार यापूर्वीही वादात सापडले होते. पण त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजप नेत्याचा भाऊ जालीमपुरवा गावात राहणाऱ्या नीरज पालला ठाण्यात बोलावून मारहाण केली होती. भाजपने या प्रकरणात तत्कालीन डीआयजी अनंत देव यांच्याकडे तक्रारही केली होती. पण कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. याशिवाय कुडी गावचे रहिवासी संदीप यादव यांच्याशी बोलतानाही अश्लिल भाषेचा वापर केला होता, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanpur police officer talking with women at uttar pradesh video viral