Kargil War Heros : रियल लाइफ हिरोची शौर्य गाथा; युद्धात पाय गमावला, मृतही घोषित झाला, तरीही तो...

Kargil War Heros: या रियल लाइफ हिरोची शौर्य गाथा अनेकांसाठी प्रेरणादायी
Kargil War Heros
Kargil War Herosesakal

Kargil Vijay Diwas Hero Story In Marathi :

कारगीलच्या युद्धात अनेक शूरवीरांनी आपले प्राण पणाला लावून देशाला विजय मिळवून दिला. अशाच एका शूरवीराने या भारत पाकीस्तान युद्धीत आपला पाय गमावला.

त्यांना युद्धादरम्यान मृतही घोषित करण्यात आले होते. पण ते मृत्यूच्या दाढीतून परतले आणि नंतरचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले. या रियल लाइफ हिरोचे नाव मेजर देवेंद्र पाल (डीपी) सिंह आणि दिवस होता १५ जुलै १९९९.

Kargil Vijay Diwas Hero
Kargil Vijay Diwas Heroesakal

मेजर डीपी सिंह या घटनेला त्यांचा पूनर्जन्म मानतात. इंडिया डॉट कॉमवर प्रसिद्ध वृत्तात त्यांनी सांगितले, युद्धात त्यांच्याजवळ एक शेल येऊन पडले. ज्यात ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी पहिल्याच नजरेत त्यांना मृत घोषित केलं.

पण या साहसी वीराच्या तीव्र इच्छाशक्तीने त्यांना पुन्हा जिवंत केले. त्यावेळी ते २५ वर्षांचे होते. या घटनेने डीपी सिंह यांचे संपूर्ण आयुष्य बदलवले. त्यांच्या उजव्या पायाला झालेल्या इजेने इंफेक्शन झाले आणि संपूर्ण पाय कापण्याची वेळ आली.

Kargil War Heros
Kargil Vijay Diwas: 'जरा याद करो कुर्बानी', जाणून घ्या 'या' सहा शुरवीरांची कहानी
Kargil Vijay Diwas Hero
Kargil Vijay Diwas Heroesakal

पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी या दुखापतीला आव्हान म्हणून स्वीकारले आणि हळूहळू बरे होऊ लागले. त्यांनी निश्चय केला की ते मॅरेथॉन धावण्याचा प्रयत्न करतील आणि नव्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करतील.

त्यांनी आपल्या पायाला एक मेटल प्लेट जोडली आणि आपल्या अपंगत्वावर मात करण्याचे ठरवले. आता डिपी सिंह भारताचे पहिले ट्रेंड रनर झाले आहेत. ते आजवर २६ हाफ मॅरेथॉन धावले आहेत. त्यांच्या नावाची नोंद लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये पिपल ऑफ द इयर २०१६ च्या यादीत जोडले गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com