फ्रेशर्स पार्टी पडली महागात; मेडिकल कॉलेजमधील 182 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SDM Colllege Karnataka

आठवडाभरापूर्वी विद्यार्थ्यांच्या एका इव्हेंटमुळं संसर्ग पसरला. या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते.

फ्रेशर्स पार्टी महागात; मेडिकल कॉलेजमधील 182 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

कर्नाटकातील (Karnataka Covid 19 Update) धारवाडात असणाऱ्या एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड हॉस्पिटलमधील (SDM Colllege Karnataka) आणखी 116 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं नवीन प्रकरणं आल्यानंतर, आता महाविद्यालयातील कोरोना बाधितांची संख्या 182 वर पोहोचलीय.

गुरूवारी 66 वैद्यकीय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संस्थेची दोन वसतिगृहे सील करण्यात आली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी, कर्मचारी आणि अन्य 690 लोकांची आतापर्यंत चाचणी करण्यात आलीय.

हेही वाचा: 'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'

'या' घटनेमुळं पसरला कोरोना

धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी सांगितलं, की आठवडाभरापूर्वी विद्यार्थ्यांच्या एका इव्हेंटमुळं संसर्ग पसरला. या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. त्यामुळं या सर्वांना कोविड चाचणी करून घेण्यास सांगण्यात आलंय. पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं असून ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांना लस दिली जात आहे.

हेही वाचा: 'मोदींच्या दाढीत घरंच घरं'; एकदा दाढी झाडली की, 50 लाख घरं बाहेर पडतात'

तामिळनाडू, कर्नाटकात 'इतकी' प्रकरणं

तामिळनाडूमध्ये गुरुवारी कोविड-19 चे 739 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 27,23,245 वर पोहोचलीय, तर संसर्गामुळं आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 36,432 वर पोहोचली आहे. तसेच, गुरुवारी कर्नाटकात कोविडचे 306 नवीन रुग्ण आढळले, तर तेलंगणात 147 नवीन रुग्ण आढळले असल्याची माहिती तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा सरकारनं माहिती दिलीय.

हेही वाचा: मायावतींना मोठा धक्का; 75 टक्के आमदारांची पक्षाला 'सोडचिठ्ठी'

loading image
go to top