

Handicapped husband killed Mysore
ESakal
पती, पत्नी आणि त्यांचा मित्र हे तिघेही दिव्यांग होते. त्यांना ऐकू किंवा बोलता येत नव्हते. मात्र पतीची हत्या होते आणि संशय मित्रावर येतो. पण सर्वात मोठे आव्हान हे होते की, आरोपी आपली बाजू स्पष्टपणे मांडू शकत नव्हता, तसेच पीडितेची पत्नीही आपला जबाब देऊ शकत नव्हती. परिणामी, पोलिसांना हे प्रकरण सोडवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र नंतर जेव्हा सत्य समोर आले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.