Karnataka Election : गांधी घराण्यावर संघर्षाची वेळ, इंदिराजींप्रमाणं राहुललाही साथ द्या; प्रियांकांची भावनिक साद

इंदिरा गांधींना जवळपास ४५ वर्षांपूर्वी ज्या घटनेचा सामना करावा लागला होता, तीच घटना आज पुन्हा घडली आहे.
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023esakal
Summary

चिक्कमंगळूर जिल्ह्यातील नागरिकांशी असलेल्या त्यांच्या सहवासाची प्रियांकानी या वेळी आठवण करून दिली.

Karnataka Assembly Election 2023 : इंदिराजींना त्यांच्या कठीण काळात चिक्कमंगळूरच्या जनतेनं साथ दिली. जनतेनं आशीर्वाद देऊन लोकसभेत निवडून दिलं. आज कॉंग्रेस आणि गांधी घराण्यावर अशीच संघर्षाची वेळ आली आहे. काँग्रेस आणि आम्हा सर्वांना तुमची निश्चितपणे साथ मिळेल, असं भावनिक आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा (Priyanka Gandhi-Vadra) यांनी केलं.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : कर्नाटकात एन्ट्री होताच CM योगींनी उचलला आरक्षणाचा मुद्दा; म्हणाले, संविधानाच्या विरोधात..

'इंदिरा गांधींवर खोटा गुन्हा दाखल'

चिक्कमंगळूर जिल्ह्यातील नागरिकांशी असलेल्या त्यांच्या सहवासाची प्रियांकानी या वेळी आठवण करून दिली. आपला भाऊ, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरविल्याचा संदर्भ देत प्रियांका म्हणाल्या, की 'इंदिरा गांधींना जवळपास ४५ वर्षांपूर्वी ज्या घटनेचा सामना करावा लागला होता, तीच घटना आज पुन्हा घडली आहे. तेव्हा इंदिरा गांधींवर खोटा गुन्हा दाखल केला होता. देव आणि लोकांच्या आशीर्वादाने आपण सत्यासाठी लढत आहोत आणि विजयी होऊ.'

Karnataka Assembly Election 2023
VIDEO : टोकाचे विरोधक बेळगाव विमानतळावर आले आमनेसामने; बोम्मई-सिद्धरामय्यांच्या भेटीत काय घडलं?

'त्या दिवशीही पाऊस पडत होता'

काँग्रेसनं आयोजित केलेल्या जाहीर सभेला मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ‘‘माझे वडील दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी ही येथे आले होते. इंदिराजीही येथे आल्या होत्या आणि जेव्हा त्या येथे आल्या तेव्हा त्यांच्यासाठी संघर्षाचा काळ होता. १९७८ मध्ये इंदिराजी या भूमीवर आल्या, त्या दिवशीही पाऊस पडत होता. पाऊस हा शुभशकून आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. मीही तुमच्यासमोर स्टेजवर, त्याच मैदानावर आणि त्याच वातावरणात उभी आहे. माझ्या कुटुंबातील तीन पिढ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानते. इंदिराजींनी सांगितलं की, जेव्हा त्या त्यांच्या संघर्षाच्या अत्यंत कठीण काळातून जात होत्या, तेव्हा चिक्कमंगळूरची जनता त्यांच्या पाठीशी उभे राहिली.’’

Karnataka Assembly Election 2023
Sudan : हिंसाचारात माझे सहकारी मारले गेले, आता मी कधीच..; सुदानमधून परतलेल्या भारतीयांनी सांगितला भयानक अनुभव

भावासाठी आशीर्वाद मागितला...

श्रृंगेरी शारदाम्मा देवीला प्रार्थना केली. तिथे मला शंकराचार्य भेटले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथून निवडणूक लढवली होती का, असा सवाल त्यांनी केला. होय, मी म्हणाले की त्यांनी चिक्कमंगळूरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी आशीर्वाद दिला. मी माझ्या भावासाठी आशीर्वादही मागितले, असं प्रियांका यांनी श्रृंगेरी मंदिराला भेट दिल्यानंतर सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com